कोल्हापूर

आरोग्य विभागाकडे अपूरे मनुष्यबळ

CD

आरोग्य विभागाकडे अपूरे मनुष्यबळ
जबाबदारीची बहुतांशी पदे रिक्त ः स्वच्छतेच्या कामासाठी होतेय कसरत

पंडित कोंडेकर : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ४ : पाणी आणि स्वच्छता हे अत्यंत संवेदनशील विषय समजले जातात. त्यामुळे या दोन बाबींकडे महापालिका प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जाते. यातील स्वच्छतेच्या प्रश्नावर अलीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छ व सुंदर राखण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून केले जाते. मात्र या विभागाकडे खूपच कमी मनुष्यबळ असल्यामुळे कामाचे नियोजन करताना मर्यादा पडत आहेत. कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढत चालला आहे. मंजूर आकृतीबंधानुसार स्वच्छतेच्या कामात प्रत्यक्षात कार्यरत असणाऱ्या तब्बल विविध १७२ जागा रिक्त आहेत. पुरेसे मनुष्यबळ मिळाल्यास शहरातील स्वच्छतेचे काम अधिक प्रभावीपणे करता येणे शक्य आहे.
शहरात दररोज सरासरी १०० टन कचरा निर्माण होतो. सणासुदीत विशेषतः दसरा, दिवाळीत तर कचऱ्याचे प्रमाण खूपच वाढते. त्यामुळे कचरा संकलन व उठावाचे नियोजन कोलमडते. अलीकडे काही वर्षात केंद्र व राज्य शासनाने स्वच्छतेवर भर दिला आहे. त्यासाठी विविध अभियान राबवण्यात येत आहे. यामुळेच शहर कचरा कोंडावळा मुक्त झाले आहे. घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे कचरा संकलित केला जात आहे. पण शहरातील सार्वजनिक ठिकाणची स्वच्छतेसाठी व त्या कामावर नियंत्रणासाठी पुरेसे मनुष्यबळ महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही. महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधानुसार खुपच कमी मनुष्यबळ उपलब्ध आहे. प्राप्त माहितीनुसार तब्बल १७२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे दैनंदिन स्वच्छतेचे काम करताना कसरत करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. महापालिकेने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी हद्दी निश्चीत केल्या आहेत. पण त्या हद्दीच्या संख्येनुसार मनुष्यबळ नसल्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यांच्या नियंत्रण करणाऱ्या स्वच्छता व वार्ड निरिक्षकांना नियोजन करताना कसरत करावी लागत आहे.
---------
प्रशासनाचा डोलारा स्वच्छता कर्मचाऱ्यांवर
अनुकंपा, वारसा हक्काने स्वच्छता कर्मचारी महापालिकेत रुजू झाले आहेत. यातील बरेच कर्मचारी शिक्षित आहेत. त्यामुळे शंभरहून अधिक कर्मचारी विविध विभागात प्रशासकीय कामकाज पहात आहेत. यातील अनेक कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीस नकार दिला आहे. त्यामुळे नेमणूक स्वच्छता कर्मचारी अशी आहे, पण प्रत्यक्षात ते कार्यालयीन कामकाज पाहतात. त्यामुळेही प्रत्यक्षात स्वच्छतेचे काम करण्यास मनुष्यबळ कमी पडत आहे.
-----------
स्वच्छता विभाग मनुष्यबळ
पद नामावली * आकृतीबंधानुसार संख्या * कार्यरत कर्मचारी * तफावत
मुख्य स्वच्छता निरीक्षक * ४ * २ * २
स्वच्छता निरिक्षक * २० * ७ * १३
वॉर्ड निरीक्षक * १२ * ५ * ७
मुकादम * २६ * ५ * २१
स्वच्छता कर्मचारी * ७४२ * ६१३ * १२९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS तुकाराम मुंढेंना मातृशोक, पुण्यात आईचं निधन; बीडमध्ये होणार अंत्यसंस्कार

Latest Marathi News Live Update : दक्षिण रायगडमध्ये ढगाळ वातावरण; जोरदार वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा

Satara District Bank: राज्य सरकारकडून सातारा जिल्हा बँकेच्या भरतीला स्थगिती; भरती प्रक्रियेत गैरव्यवहार, कायदेशीर लढ्याला यश!

Karad News: अतिक्रमणे हटवली; हॉकर्स झोन करा, कऱ्हाडला हातगाडाधारक आग्रही; किरकोळ विक्रेत्यांसाठी नियोजनबद्ध जागेची मागणी

IPL 2026: अजिंक्य रहाणेच्या उत्तरानंतर ग्रीनने घेतला बॉल हातात, KKR साठी गोलंदाजीला आजच उतरणार?

SCROLL FOR NEXT