कोल्हापूर

रेबीज

CD

75277
कोल्हापूर : महापालिकेतर्फे भटक्या कुत्र्यांचे लसीकरण सुरू केले आहे.

महापालिकेकडून भटक्या कुत्र्यांचे
रेबीज प्रतिबंधक लसीकरण सुरू
कसबा बावडा परिसरात ४७ कुत्र्यांना लस
कोल्हापूर, ता. ४ : महापालिकेने भटक्या कुत्र्यांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण आजपासून सुरू केले. कसबा बावडा परिसरात दिवसभरात ४७ कुत्र्यांचे लसीकरण केले. शहरात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील व सहायक आयुक्त कृष्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम राबविण्यात येत आहे. कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांना मारणे, इतरत्र सोडणे यास मनाई आहे. त्यासाठी भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात आहे. आजअखेर ७५०० पेक्षा जास्त कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे. शस्त्रक्रियेची जखम बरी झाल्यानंतर त्या कुत्र्यांना मूळ जागी सोडण्यात येणार आहे.
भटक्या कुत्र्यांना रेबीज हा प्रामुख्याने आजार होतो. यासाठी भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लस महापालिकेतर्फे देण्यात येत आहे. यासाठी कुत्री पकडण्यासाठी विशिष्ट जाळया तयार केल्या आहेत. याद्वारे पकडून तिथेच लस दिली जाते व तो कुत्रा ओळखण्यासाठी निळ्या रंगाची विशिष्ट खूण केली जाते. नंतर सोडले जाते. पशुसंवर्धन विभागातर्फे रेबीज प्रतिबंधक लस मोफत उपलब्ध करून दिली आहे. यावेळी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, पशुधन विकास अधिकारी डॉ. किरण उनवणे, आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील, सहायक आरोग्य निरीक्षक अनिकेत सूर्यवंशी उपस्थित होते.
---------------
चौकट
नागरिकांसाठी लस उपलब्ध
नागरिकांसाठी आवश्‍यक असलेली रेबीज प्रतिबंधात्मक लस छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) व सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडे उपलब्ध आहे. तसेच भटक्या कुत्र्यांबाबत तक्रार करावयाची असल्यास सहायक आरोग्य निरीक्षकांशी संपर्क (९५६१८१४४७४) करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT