कोल्हापूर

कसदार लेखनाची जबाबदारी वाढली

CD

फोटो ः 75309

कसदार लेखनाची जबाबदारी वाढली
डॉ. अर्जुन चव्हाण; विद्यापीठातील हिंदी विभागात सत्कार

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः लेखक हा पुरस्कारांसाठी लिहित नसतो, तर तो समाजाला योग्य दिशा, प्रेरणा देण्यासाठी लिहित असतो. याच विचाराने लिहित राहिलो आणि समाजाने याची दखल घेतली आणि राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळत गेले. आता महाकवी कालिदास पुरस्कारामुळे आणखी कसदार लेखनाची जबाबदारी वाढल्याचे जाणीव असल्याचे मत ज्येष्ठ हिंदी लेखक प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी व्यक्त केले.
डॉ. चव्हाण यांना त्यांच्या काव्य, गीत, गझल यातील दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल विश्व हिंदू शोध संवर्धन अकादमी वाराणसी व बनारस हिंदू विद्यापीठाने नुकतेच महाकवी कालिदास या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. यानिमित्ताने शिवाजी विद्यापीठातील हिंदी विभागातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
हिंदीचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. ए. एम. सरवदे यांच्या हस्ते डॉ. चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. चव्हाण यांचे समग्र साहित्य हे विद्यार्थ्यांसाठी सतत प्रेरणादायी असल्याची भावना डॉ. सरवदे यांनी व्यक्त केली. डॉ. चंदा सोनकर, अक्षय भोसले, प्रकाश निकम, प्रियंका बालेशगोल, फरदीन जमादार, अमृता खोत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. संपतराव जाधव, डॉ. प्रकाश मुंज, विजय सदामते, अनिल मकर, मेघा तोडकर, प्राजक्ता कुरळे, प्राजक्ता रेणुसे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: फॉर्म, फटका आणि फोकसची परीक्षा! शुभमन गिल-श्रेयस अय्यर आज आमणे सामने; कशी असेल संभावित Playing XI

Nagpur News: कामगाराचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह; कामगाराची पार्श्वभूमी व रहिवास

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Laxman Hake:सातारा झेडपी अध्यक्षपदी ओबीसींना डावलले: ओबीसी नेते लक्ष्मण हाके; दोन सप्टेंबरचा अध्यादेश बेकायदा, मराठ्यांनी हक्क हिरावला!

Nagpur News: सिलिंडर साठी ग्राहकांचा उन्हात संघर्ष; वानाडोंगरीत लांबच लांब रांगा ; घरपोच सेवा बंद झाल्याने संताप

SCROLL FOR NEXT