कोल्हापूर

राष्ट्रीय मुद्द्यांवर महायुतीचा प्रचार

CD

मतदारसंघ सांभाळा, महाराजांवर टीका टाळा
महायुतीतील नेत्यांना सूचना ः बैठकीत प्रचाराची दिशा, राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ ः महायुतीमधील घटक पक्षांच्या नेत्यांनी आपले मतदारसंघ, भाग यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आपल्या भागातील अधिकाधिक मतदान करून घ्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयांची, केंद्रातील योजना आणि मंडलिकांनी केलेली विकासकामे याची प्रसिद्धी करा. लाभार्थ्यांपर्यंत संवाद साधा, अशा सूचना महायुतीमधील नेत्यांना दिल्या आहेत. काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यावर कोणतीही टीका करू नका, असेही नेत्यांना सांगण्यात आले आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक झाली. त्यामध्ये प्रचाराची दिशा ठरवण्यात आली.
कोल्हापूर लोकसभा निवडणूक सध्या तरी दुरंगी दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील बहुतांशी मोठे गट हे महायुतीच्या बाजूने दिसत आहेत. असे असले तरी महाविकास आघाडीचे पारडेही जड आहे. महायुतीच्या नेत्यांची नुकतीच एक बैठक झाली, यामध्ये सुरुवातीच्या टप्प्यातील प्रचाराची दिशा ठरवण्यात आली. आमदार प्रकाश आबिटकर, राजेश पाटील यांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे. तर समरजितसिंह घाटगे, अमल महाडिक यांना त्यांच्या मतदारसंघावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक हे सर्व प्रचारयंत्रणा हाताळणार आहेत. प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारच्या योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय त्याचबरोबर संजय मंडलिक यांनी केलेली विकासकामे यांची मांडणी करण्याचे ठरले आहे. नेते आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यावर कोणतीही टीका करायची नाही, अशी सूचनाही कार्यकर्त्यांना दिली आहे.
------
चौकट
लाभार्थ्यांशी संवाद
जिल्ह्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास योजनांचे लाभार्थी अधिक आहेत. या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याचे काम सध्या महायुतीमधील नेते, कार्यकर्ते करत आहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे मतदान करून घेण्याचे निश्चित केले आहे.
-------------------
चौकट
भाजपचा सोशल मीडिया सक्रिय
संजय मंडलिक यांच्या सोशल मीडियावरील फारशा पोस्ट पाहायला मिळत नाहीत. त्या तुलनेत भाजपचा सोशल मीडिया अधिक सक्रिय झाला आहे. त्यांनी सुरू केलेला ‘मुद्द्याचे बोला’ हा ट्रेंड सध्या सुरू आहे. नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या पोस्टही ते व्हायरल केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

SCROLL FOR NEXT