कोल्हापूर

सोलापुरातील कचऱ्याबाबत जनसुवानणी घ्या

CD

75317

सोलापुरातील जैववैद्यकीय
कचऱ्याबाबत सुनावणी घ्या

शिवसेना ठाकरे गटाची मागणी

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ४ ः सोलापुरातील जैववैद्यकीय कचरा कोणाच्या परवानगीने कोल्हापुरात आणला, त्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली का, याबाबतची सुनावणी घेऊन दोषींवर कारवाई करावी. जनतेच्या आरोग्याशी केली जाणारी हेळसांड सहन केली जाणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी आज दिला. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रादेशिक उपसंचालक प्रमोद माने यांना दिले.
यावळी जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, ‘शहरातील कचऱ्यावर वर्षानुवर्षे प्रक्रिया होत नाही. त्यामुळे त्याचा ढीग साचला आहे. त्याला आग लागून त्या धुरामुळे अनेक आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. जैववैद्यकीय कचरा अतिशय गंभीर आहे. सोलापुरातील हा कचरा कोणाच्या परवानगीने आणला गेला, यासाठी कोणाची परवानगी आणि विहीत प्रक्रिया पार पाडली होती का, हे पाहणे गरजेचे आहे. महापालिकेने कचऱ्याचा ठेका ३० वर्षांसाठी दिला आहे. हे देशातील एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी घ्यावी. जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्हालाही सहभागी करून घ्यावे.’ यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, विशाल देवकुळे, राहुल माळी, अभिजीत बुकशेट, संजय जाधव उपस्थित होते.

प्रमुख मागण्या
- कचरा आणण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी आणली का?
- या कचऱ्याचे संकलन वाहतूक नियमाप्रमाणे झाले आहे का?
- कचरा महापालिकेच्या प्रकल्पावर जाळला असल्यास विल्हेवाट रिपोर्ट, डिझेल बिले, वाहतूक बिले, सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध व्हावे.
- ज्या कंपनीने कचरा आणला त्यांना सोलापुरात कचरा संकलनाची परवानगी आहे का याचा खुलासा करावा.
- महापालिकेने हद्दीबाहेरील कचरा का घेतला याचाही खुलासा व्हावा.

कोट
सोलापुरातील जैववैद्यकीय कचरा कोल्हापुरात आणण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. ही परवानगी महापालिकेने दिली आहे का? याबाबतची माहिती महापालिकेकडून मागविली आहे. सर्व कागदपत्रे पाहिल्यावर पुढील कार्यवाही करू.
- प्रमोद माने, प्रादेशिक उपसंचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT