कोल्हापूर

अंबाबाई मुर्ती चेहरा व किरीट तत्काळ संवर्धन आवश्यक

CD

श्री अंबाबाई मूर्तीचा चेहरा,
किरिटाचे तत्काळ संवर्धन आवश्यक
न्यायालयात तज्ज्ञांचा अहवाल सादर, खबरदारीच्या सूचनाही

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीच्या गळ्याखालील भागाची झीज झाली आहे. ती २०१५ मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहे. मूर्तीच्या नाक, ओठ, हनुवटीवरही तडे गेले आहेत. ते सुध्दा २०१५ मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांचे असून मूर्तीचा चेहरा व किरिटाचे तत्काळ संवर्धन करणे आवश्यक असल्याचा अहवाल आज न्यायालयात सादर झाला. दरम्यान, योग्य त्या खबरदारीच्या सूचनाही या आठ पानी अहवालात तज्ज्ञांनी दिल्या आहेत.
श्री अंबाबाईच्या मूर्ती संवर्धनासंबंधीचा दावा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर (कोल्हापूर) यांच्यासमोर सुरू आहे. या दाव्यामध्ये श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांच्यासह वादींनी पुरातत्त्‍व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून मूर्तीची पाहणी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गेल्या चौदा व पंधरा मार्चला ही पाहणी झाली. पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगीराज यांनी केलेल्या या पाहणीचा अहवाल आज न्यायालयात सादर झाला. यावेळी ॲड. नरेंद्र गांधी, ॲड. ओमकार गांधी, वादी गजानन मुनीश्वर, अजिंक्य मुनीश्वर, लाभेश मुनीश्वर, प्रतिवादी दिलीप देसाई, ॲड. प्रसन्न मालेकर उपस्थित होते.

अहवालातील निष्कर्ष व उपाययोजना अशा...
० २०१५ मध्ये झालेल्या संवर्धन प्रक्रियेसाठी वापरलेले साहित्य मूळ पाषाणाशी जुळवून घेऊ न शकल्याने त्याचे तडे जाऊन थर निघत आहे. अन्य ठिकाणी दिलेल्या लेपालाही तडे गेले आहेत.
० मूर्ती भक्कम करण्यासाठी येथील सिलिकेटचे द्रव्य वापरून हे तडे मुजवता येतील. मूर्तीला जुळवून न घेणारे जुन्या संवर्धन प्रक्रियेतील साहित्याचे सगळे थर रासायनिक संवर्धन प्रक्रियेने काढून नव्याने थर द्यावे लागतील.
० संवर्धन प्रक्रियेनंतर रंगविरहित संरक्षक द्रव्याचा थर देऊन मूर्ती सुरक्षित करावी लागेल.
० वेळोवेळी मूर्तीचे निरीक्षण करून योग्य ती काळजी घ्यावी.
० मूर्तीला स्नान न घालता नाजूक सुती कापडाने पुसून घेणे.
० मूळ मूर्तीला पुष्पहार किंवा फुले न घालता केवळ उत्सव मूर्तीला फुलांचे हार घालणे.
० गर्भगृहातील संगमरवर काढणे आणि कीटकांचा उपद्रव होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करणे.
० गाभाऱ्यातील आर्द्रता व तापमानाचे नियंत्रण करणे.
० मूर्तीवर अलंकार व किरीट घालताना योग्य ती काळजी घेणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT