कोल्हापूर

ऍडव्हेंचर समर कॅम्प

CD

रोमहर्षक खेळांसह निसर्गाचा आनंद लुटा
‘सकाळ’, व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क तर्फे रविवारी समर फन कॅम्प

कोल्हापूर, ता. २४ : सकाळ माध्यम समूह व व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्कच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय समर फन कॅम्पचे आयोजन केले आहे. रविवारी (ता. २८) दिवसभर आनंद द्विगुणीत करण्यासाठी हा समर कॅम्प वेगळा ठरणारा आहे. 
निसर्गसंपन्न मसाई पठाराचा प्रदेश, इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळा किल्ल्याचे सान्‍निध्य, अशा वातावरणात रोमांच निर्माण करणारा साहसी अनुभव मिळणार आहे. स्वतःच्या शारीरिक व मानसिक क्षमता अजमावणाऱ्या व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क येथे अस्सल रोमहर्षक खेळांसह निसर्गाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे. यामध्ये अनेक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आहेत. यामध्‍ये मुलांसह पालकांनाही प्रवेश आहे. कॅम्पमध्ये झिप लाईन, हाय रोप, बंजी इजेक्शन, स्पोर्टस् क्लायंबिंग, रॅपलिंग, स्लॅक लाईन, प्लॅन्क रेस, रस्सीखेच असे प्रकार असतील. चहा व नाश्ता, दुपारी शाकाहारी जेवण आहे. सशुल्क असणाऱ्या या कॅम्पमध्ये ग्रुप बुकिंगवर आकर्षक सूट देण्यात येणार आहे. कॅम्पमध्ये सुरक्षिततेच्या नियमांवर प्रशिक्षण दिले जाईल आणि तुम्हाला सर्व आवश्यक सुरक्षा उपकरणे पुरविली जातील.
व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क हे सर्व कुटुंबासाठी मज्जा करण्याचे ठिकाण आहे. येथे विविध कौशल्यांच्या पातळीसाठी योग्य असलेल्या क्रिया दिल्या जातात. त्यामुळे लहान मुले ते मोठे लोक सर्वजण आनंद घेऊ शकतात.

चौकट
माहिती व प्रवेशासाठी येथे करा संपर्क
व्हर्टिकल ॲडव्हेंचर पार्क हे तुमच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचे परीक्षण करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. चढाई आणि इतर क्रिया तुमच्या स्नायूंना मजबूत करतील. तुमचे समन्वय सुधारतील आणि तुमचा आत्मविश्वास वाढवतील.
अधिक माहिती व प्रवेश निश्चितीसाठी संपर्क : सूरज जमादार - ९५५२५८१९१८.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: जिद्द, कष्ट आणि ध्येयवेड! ओमकार पेटेकर बनला डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश, विद्यार्थ्यांसाठी सुयश प्रेरणादायी..

​Pune News: पाषाणमधील रस्त्याची झाली कचराकुंडी; कचरा जाळल्याने रहिवाशांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम

IPL 2026: मुंबईकडून घरच्या मैदानात विजयाचा श्रीगणेशा? आज KKR विरुद्ध सामना; जाणून घ्या संभावित Playing XI

Pune News: बाणेर रस्त्यावर अडथळ्यांची शर्यत!; खोदलेले रस्ते, पदपथ दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ठिकठिकाणी माती अन् राडारोडा

Pune Crime:पुण्यात डिलिव्हरी बॉयकडून वसतिगृहात अश्लील वर्तन; धक्कादायक प्रकार, परदेशी विद्यार्थिनींची सुरक्षा चव्हाट्यावर

SCROLL FOR NEXT