कोल्हापूर

पोलिस वृत्त

CD

जोतिबा यात्रेकरूंचे
मोबाईल पळविले

कोल्हापूर : जोतिबा यात्रेला आलेल्या दोन भाविकांचे मोबाईल पळविले. यमाई मंदिर परिसर आणि भाविकांसाठी असलेल्या मोफत बसमध्ये गर्दीचा फायदा घेत हा प्रकार घटला. या दोन्ही चोऱ्यांची नोंद कोडोली पोलिसांत करण्यात आली. फिर्यादी राजेंद्र वल्लभ जुगळे (वय २१, रा. कुरुंदवाड) मित्रासोबत दुचाकीवरून जोतिबा दर्शनाला आले होते. घाटातील आंब्याच्या झाडाजवळ दुचाकी पार्क करून मोफत बसमध्ये बसताना गर्दीतील चोरट्याने त्यांच्या खिशातील मोबाईल लांबवला, तर प्रदीप शिवाजी कुंभार (वय ४२, रा. कडेगाव, सांगली) यमाई देवीच्या दर्शनाला गेले असताना अज्ञाताने त्यांच्या खिशातून मोबाईल चोरला.
..........................
केएमटीच्या धडकेत
दाम्‍पत्य जखमी

कोल्हापूर : गंगावेश चौकात केएमटीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दाम्पत्य जखमी झाले. अरविंद सदाशिव मस्कर आणि अनुराधा अरविंद मस्कर (रा. शिंगणापूर) अशी जखमींची नावे आहेत. दुपारी बाराच्या सुमारास केएमटी बोंद्रेनगरहून छत्रपती शिवाजी चौकाकडे निघाली होती. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत करण्यात आली.
..................
किरकोळ वादातून
दोघांवर कटरने वार

कोल्हापूर : किरकोळ वादातून गंगावेश चौकात विक्रम सीताराम पोवार (वय ३२, रा. शनिवार पेठ) आणि बाळू आनंदराव कुराडे (वय ४८, रा. जिव्हाळा कॉलनी, शिंगणापूर) यांच्यावर कटरने वार करण्यात आला. जखमी अवस्थेत दोघांना उपचारासाठी दाखल केले. विक्रम पोवार यांच्या हाताला तर कुराडे यांच्या डोक्यात कटरने वार करण्यात आला. साईर नावाच्या तरुणाने वार केल्याचे जखमींनी पोलिसांना सांगितले. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली.
....................
तरुणास मारहाण
कोल्हापूर : किरकोळ कारणावरून झालेल्या मारहाणीत सुंदर सुखलाल धाकरे (वय १९, रा. राजेंद्रनगर) हा तरुण जखमी झाला. बुधवारी रात्री राजेंद्रनगर येथे हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'आम्ही १५ वर्षांचे असताना असे नव्हतो...' Vaibhav Sooryavanshi बद्दल अभिषेक शर्मा नेमकं काय म्हणाला?

Gangapur News : अल्पवयीन पीडितेवर अत्याचार प्रकरणात आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास; गंगापूर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

विजय साळगावकर सुटलाच नसता, 'दृश्यम ३' मध्ये सगळ्यात मोठी चूक; पोलिसांनी दुर्लक्षित केली ती गोष्ट, तुम्हाला कळली का?

Wani News : दिंडोरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने रास्ता रोको; शेतकरी, आदिवासी व नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन, दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश करण्याची मागणी

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

SCROLL FOR NEXT