कोल्हापूर

राजकारणाचा फड ः पोलिस ठाणे

CD

फोटो
80620, 80865

फड मतदारांचा
- गौरव डोंगरे

निवडणूक कुठलीबी असूद्या ओ, आम्ही रस्त्यावरच...
पोलिस कर्मचाऱ्यांची भावनाः अनेक वर्षे पोस्टल मतदानाचाच आधार

गावी जायचं झालं तर दिवसा उजेडीच जायला लागतंय. रात्र झाली तर वडापच्या वाहनांचा आधार घ्यायला लागतोय. बहुतांश आदिवासी जिल्हा असल्यामुळं आम्ही शेकडो किलोमीटर इकडे नोकरीला आलो. कितीही लांब असलो तरी गावाकडं मन वळतंच की... आमचा मतदार संघ हितनं साडेचारशे किलोमीटर अंतरावर, गावाकडे वर्षातून एकदाच फेरी होते. आई-वडील, भाऊबंद सांगतात गावात कुणी काय सोय केली, त्यावरून ठरवतो कोणाला मतदान करायचं, अशी व्यथा नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील रहिवाशी पोलिस अंमलदार चिंतामणी सांगत होते. मतदानाला जायला कुठं मिळतंय ओ, पोस्टानंच मतदान करतोय कित्येक वर्षे... हीच भावना अनेक पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची आहे.

लोकसभा निवडणुकीच्या घोषणेपासूनच पोलिसांची लगबग सुरू आहे. पोलिस मुख्यालय, पोलिस ठाण्यांमध्ये लगीनघाई सुरू आहे. बोलायला म्हटलं तरी कर्मचाऱ्यांना वेळ कुठे आहे. शहरातील काही पोलिस ठाण्यांचा कानोसा घेण्यासाठी बाहेर पडलो. शनिवारी कोल्हापूरला महायुतीच्या उमेदवारांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झाली. मोदींची सभा सायंकाळी तपोवन मैदानावर असली तरी पहाटेपासूनच विमानतळ ते संभाजीनगर रस्त्याच्या दुतर्फा पोलिसांचा गराडा. यातील काहींशी बोलण्याचा प्रयत्न केला.
बंदोबस्ताला तैनात झाडाच्या सावलीत थांबून दोघा पोलिसांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. राजकारण, राजकारणी यांच्यावर बोलण्यास टाळणारे पोलिस मित्र त्यांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करीत होते. एक जण म्हणाला, ‘सोसायटीची निवडणूक असूदे, नाही तर लोकसभेची... आमच्या बंदोबस्ताशिवाय पर्याय नाही. आता मोदी साहेब निवडून आले काय किंवा राहुल गांधी, आमच्या कामात कुठं फरक पडणार आहे. त्यांच्या सभा असल्या तरी आमचं तेच काम अन् निकाल लागून ते सत्तेत आले तरी आम्ही असेच उभं असणार की ओ. शाहू महाराजांचं नाव जाहीर झाल्यापासून वातावरण दिसत हुतं ते शाहू महाराजांचं. देशाचा पंतप्रधान कोल्हापुरात सभा घेतोय म्हणजे पब्लिकवर काही तरी परिणाम हुणार की नाही, कसं म्हणता.?’ दुसरा सहकारी बोलला, ‘परिणाम होणार ठीक हाय रे, खरं अलीकडं लोक आपल्याला तर कुठं अंदाज देत्यात. पोलिसांचा पोल काय? असं विचारून आमचीच फिरकी घेण्याचा प्रयत्न करणारे स्वतःचं मात्र झाकून ठेवत्यात.’
राजकारणाची चर्चा करायला ना ठिकाण महत्त्वाचे, ना समोरची व्यक्ती... आपल्याला राजकारणातील समजलेल्या गोष्टी समोरच्याला आपापल्या पद्धतीने पटवून देण्याची धडपड पोलिस ठाण्यात आलेल्यांच्यात सुरू होती. ठिकाण होतं, सीपीआर पोलिस चौकी. ग्रामीण भागात मंडलिक साहेबांच्या वडिलांनी कामं केल्यात बघा. त्यो वाघ हुता वाघ. पक्षानं तिकीट दिलं नाही तरी गडी थांबला न्हाई बघा, अपक्ष निवडून आलाच की. त्याच्या पोराला त्या पुण्याईचा दोन टायमाला फायदा झालाय की. मग यावेळी आमच्या गावात काय नेमकं सांगता येणार न्हाई. राधानगरीवर शाहूराजांचं उपकार हाईत. त्येंच्याच घरातला माणूस उभारतोय म्हटल्यावर आमचंबी काय तरी कर्तव्य हाय की राजासाठी.’ सत्तर वर्षांचे आजोबा आपल्यापरीने राजकारणाचा कानोसा घेताना त्यांच्या मतांवर चांगलेच ठाम दिसून आले.
महिलांचा एक गट तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात आला. सफाईची कामे करणाऱ्या महिलांचे पैसे ठेकेदाराने थकवले. वैतागून आलेल्या महिला सकाळपासून भर उन्हात बसून होत्या. पोलिसांनी ज्याच्या विरोधात तक्रार आहे, त्याला बोलावून घेतो असे सांगत संध्याकाळ झाली. ‘साहेब, लोक गार वाऱ्यात बसल्यात, आमच्याबद्दल त्यांना काय देणं-घेणं हाय का’ एक मावशी आवेशात बोलत होती. दुसरी बोलली ‘सकाळी आलेले ना... आम्हाला मत द्या म्हणून सांगायला, त्यांची कधी व्हायची आपल्याला मदत. पाच वर्षांतनं एकदा येत्यात. खरं आमच्यावर असले प्रसंग आल्यावर कोण येत नसतं. आमच्या कष्टाचे पैसे अडकल्यात म्हणून पोलिस ठाण्यात आलोय, आमच्या मताची किंमत आता दाखवून देतोच’, असे बोलून एका महिलेने आपला राग व्यक्त केला. शहरातील पोलिस ठाणी, सीपीआर चौकी, मुख्यालयामध्ये ही चर्चा कानावर पडते आहे.

चौकट
पोलिस ठाण्यात लगीनघाई
निवडणुकीच्या अनुषंगाने बंदोबस्ताचे वाटप सुरू आहे. व्हीआयपी दौऱ्यांचे नियोजन केले जात आहे. सभास्थळांची पाहणी आणि
वरिष्ठ कार्यालयाला महिती कळविण्याची लगबग सध्‍या पोलिस ठाण्यांमध्ये सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT