कोल्हापूर

बंद फ्लॅटचा दरवाजा उचकटून दीड लाखांचा ऐवज लंपास

CD

बंद फ्लॅटचा दरवाजा उचकटून
दीड लाखांचा ऐवज पळविला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : राजारामपुरी ४ थी गल्ली येथील बंद फ्लॅटचा दरवाजा उचकटून दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी पळविला. सचिन रामचंद्र पाटील (वय ४४, रा. यश रेसिडेन्सी, राजारामपुरी) यांनी याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दोन मंगळसूत्रे, अंगठ्या, कर्णफुले आणि रोख १० हजार रुपये असा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
मंगळवारी (ता. २३) सकाळी फिर्यादी सचिन पाटील हे फ्लॅट बंद करून बाहेर गेले होते. दुपारी दोनच्या सुमारास परतले असता फ्लॅटचा दरवाजा उचकटल्याचे दिसले. बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता कपाटात ठेवलेले दागिने आणि रोख १० हजार रुपये चोरीस गेल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती पोलिसांना देताच राजारामपुरी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. या मिळालेल्या माहितीटच्या आधारे तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT