कोल्हापूर

सुषमा अंधारे पत्रकार परिषद

CD

शासकीय यंत्रणेच्या गैरवापराचा
भाजपवर बूमरँग होणार ः सुषमा अंधारे

कोल्हापूर, ता. २५ : भाजपकडून शासकीय यंत्रणेचा गैरवापर होईल, तितकेच त्यांच्यावर बूमरँग होणार आहे. याच कारणामुळे लोक भाजपवर चिडलेले आहेत, त्या लोकांना जास्त चिडवण्याचे कामही भाजपकडून केले जात आहे. लोक भाजपच्या याच कृत्याची प्रतिक्रिया मतपेटीतून दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज केली.
शिंदे गटाच्या ज्या खासदारांना लोकसभेचे तिकीट मिळाले आहे ते विजयी होणार नाहीत, त्यामुळे त्यांना कधीही उद्धव ठाकरे यांच्याकडे यावे लागणार असल्याने ते आता ठाकरे यांच्याविरोधात बोलत नसल्याचेही अंधारे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांवर, महागाईवर, महिला सुरक्षेवर बोलतील असे वाटत होते. जाती-धर्मांवर आधारित मते मागण्याऐवजी विकासकामे काय केली हे सांगून मते मागावीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोड बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यांना आम्ही महिला अत्याचारांबद्दल श्र्वेतपत्रिका काढा म्हणून मागणी करत आहे; पण त्यांच्याकडून ती काढली जात नाही.’
शिवसेना उपनेते संजय पवार, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे, स्मिता सावंत, मंजित माने उपस्थित होते.

चौकट
महाडिक, पवारांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष
संजय मंडलिकांना विजयी करा, आम्ही पाच कोटींचा निधी देऊ, हे धनंजय महाडिक यांनी जाहीर करणे आणि बारामतीमध्ये अजित पवार यांनी आमच्या चिन्हावर कचाकचा बटण दाबा आणि तसाच कचाकचा निधी घ्या, हे वक्‍तव्य म्हणजे आचारसंहितेचा भंग करण्याचा प्रकार आहे. यावर निवडणूक आयोगाची नोटीस काढली जात नसल्याचा आरोपही अंधारे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teacher Recruitment: महाराष्ट्रात शिक्षकांची भरती कधी होणार? निवृत्ती वयाबाबत मोठं वक्तव्य करत शिक्षण मंत्र्यांनी तारीखच सांगितली!

IND vs ZIM, T20 WC: अभिषेक शर्माला सूर गवसला, भारताने उभारली वर्ल्ड कपमधील सर्वोच्च धावसंख्या; २००७ चा विक्रम मोडला

Khamgaon Crime : सख्ख्या भावाचा खून करून मृतदेह जाळला व राख फेकली नदीत; राहुड येथील घटना, दोन्ही आरोपीस अटक

Pune Property Tax: पुण्यात ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना करमाफी मिळणार का? विरोधकांची तयारी मात्र भाजपनेच...

Latest Marathi News Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT