कोल्हापूर

गड- विहिरीत बुडून मृत्यू

CD

256.JPG ओंकार स्वामी 79877

पोहताना फिट आल्याने
युवकाचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. २५ ः विहिरीत अंघोळीला गेलेल्या युवकाचा फिट आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली. ओंकार बसय्या स्वामी (वय १८, रा. तनवडी, ता. गडहिंग्लज) असे मृताचे नाव आहे.
ओंकार हा तनवडी गावचा युवक. त्याने बारावीची परीक्षा दिली आहे. नेहमीप्रमाणे तो आणि त्याचे तिघे मित्र दुपारी बारा वाजता मुगळी गावच्या हद्दीतील अप्पासाहेब सिद्धाप्पा आरबोळे यांच्या विहिरीत अंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करताना ओंकारला फिट आली अन् तो बुडाला. अचानक तो दिसेनासे झाल्याने त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी ओरड केली. काही क्षणातच नागरिक गोळा झाले. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
ओंकारचे वडील बसय्या स्वामी यांचे कोरोनाने निधन झाले आहे. त्यामुळे घरची सर्व जबाबदारी ओंकारवर होती. ओंकारच्या मागे आई, दोन बहिणी आहेत. एक बहीण अविवाहित आहे. वडील बसय्या हे चहा पावडरचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या निधनानंतर ओंकारच हा व्यवसाय चालवत होता. त्यातून मिळणाऱ्या मोबदल्यातून कुटुंबाचा चरितार्थ चालत होता. गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबीयांच्या ताब्यात मृतदेह दिला. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया पोलिसांत सुरू होती.
----------------------------------------------------

कडगाव, हिरलगेत
बेकायदा दारू विक्री
गडहिंग्लज ः कडगाव व हिरलगे (ता. गडहिंग्लज) येथे विनापरवाना देशी-विदेशी दारू विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी महादेव रावसाहेब पाटील (अयोध्यानगर कडगाव) व धीरज दत्तात्रय कुंभार (३३, रा. तामजाई माळ हिरलगे) या दोघांना ताब्यात घेऊन अनुक्रमे ८ हजार ८२० आणि ७ हजार ८९१ रुपयांची दारू जप्त केली. पाटील हा कडगाव येथे अयोध्यानगर परिसरात तर कुंभार हा हिरलगेत गुंजाटी यांच्या घराच्या अडोशाला दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिविक्षाधिन सहाय्यक पोलिस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने याठिकाणी छापा टाकून ही कारवाई करून देशी-विदेशी दारू जप्त केली. पोलिस हवालदार धनाजी पाटील यांनी फिर्याद दिली.
-----------

तलावात बुडालेल्या
तरुणाचा शोध सुरूच

गडहिंग्लज, ता. २५ ः करंबळी (ता. गडहिंग्लज) येथील मंगाई तलावात अंघोळ करताना बुडालेल्या तरुणाचा शोध अद्याप लागलेला नाही. आज दुपारपर्यंत बोटीद्वारे शोधमोहीम राबवूनही तो मिळाला नाही. दीपक संभाजी तोडकर (वय २५, रा. गिजवणे, ता. गडहिंग्लज) असे या बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.
गिजवणे येथे यात्रा सुरू आहे. पालखी मिरवणुकीनंतर पाच-सहा मित्र मिळून करंबळी तलावात पोहायला गेले होते. त्यात दीपकचाही समावेश होता. ५० फुटांपर्यंत पाण्यात हे सर्वजण पोहत गेले. परत येताना दीपक मागे राहिला. तलावाच्या काठावर बसलेल्या मित्राला दीपक अचानक दिसेनासा झाला. शोधाशोध केली. परंतु, पाणी खोल असल्याने तो सापडला नाही. दरम्यान, त्याचा शोध घेण्यासाठी आज सकाळपासून गडहिंग्लज नगरपरिषदेची बोट गेली होती. दुपारी तीनपर्यंत शोध घेतला. परंतु, तो मिळालेला नाही. उद्या पुन्हा शोधमोहीम राबविणार असल्याचे सांगण्यात आले. दीपक मुंबईला नोकरीस आहे. बहिणीचे लग्न व यात्रेनिमित्त तो गावी आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results : मुंबईत भाजप सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष, महापौर महायुतीचाच होणार

Eknath Shinde Statement: मुंबईच्या महापौर पदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले..

BMC Election 2026 Result : मुंबई महापालिका निवडणूक निकालाबाबत ‘साम मराठी’चा 'एग्झिट पोल' ठरला तंतोतंत खरा!

End of the World : जगातलं शेवटचं शहर माहितीये का? जिथे पृथ्वीच संपते..लाखो लोकांना नाही माहिती

निवडणूक नियोजन, तिकीट वाटप ते रणनीतीपर्यंत... महापालिका निकालांत ‘देवेंद्र–रविंद्र’ जोडीचा करिष्मा! केमिस्ट्री ठरली गेमचेंजर

SCROLL FOR NEXT