कोल्हापूर

पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी ड्रोनला बंदी

CD

79806 ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौरा बंदोबस्त वाटपासाठी पोलिस कवायत मैदानावर लगबग सुरू होती.

पंतप्रधान मोदी यांच्या सभास्थळी ड्रोनला बंदी
विमानतळापासून सभास्थळापर्यंत कडेकोट बंदोबस्त; आज दौऱ्याची रंगीत तालीम

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता. २७) कोल्हापुरात येत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव दौरा कालावधीत ड्रोन कॅमेरा चित्रीकरणास बंदी घातली आहे. पोलिस प्रशानानकडून दौऱ्याच्या अनुषंगाने गुरुवारी बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. विमानतळापासून तपोवन मैदान येथील सभास्थळापर्यंत मार्गांची तपासणी करण्यात आली. शुक्रवारी या मार्गावरून रंगीत तालीम करण्यात येणार आहे. बंदोबस्ताला तैनात करण्यात येणाऱ्या पोलिसांना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सूचना केल्या.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित असणार आहेत. सभेच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी अलंकार हॉल येथे बंदोबस्ताचे वाटप केले. विमानतळापासून सभास्थळापर्यंतच्या मार्गावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली. पंतप्रधानांना असलेली झेड प्लस सुरक्षा व ए.एस.एल. सुरक्षा यंत्रणेमुळे विमानतळ परिसर व संपूर्ण शहरात ड्रोन कॅमेऱ्याद्वारे कोणासही चित्रीकरण करता येणार नसल्याचा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी काढला. याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांनी नेमणुकीचे ठिकाण सोडू नये, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती तातडीने स्थानिक पोलिस ठाण्यात द्यावी, व्हीआयपी मार्गावर कोठेही वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या.

चौकट
पोलिसांकडून आज मंचाची पाहणी
महायुतीची जाहीर सभा शनिवारी (ता. २७) सायंकाळी पाच वाजता तपोवन मैदानावर होत आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या मंचाची पाहणी पोलिस प्रशासनाकडून आज केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT