कोल्हापूर

इचल : उमेदवारासोबत एक दिवस

CD

उमेदवारासोबत
एक दिवस
-पंडित कोंडेकर

ich272 jpg 80156

फाळकेवाडी (ता. वाळवा) ः येथे एका कार्यकर्त्याच्या घरी उपस्‍थित ग्रामस्थांशी धैर्यशील माने यांनी संवाद साधला. (अमर चिंदे : सकाळ छायाचित्रसेवा)
---------------
ग्रामस्थांशी संवाद
अन् मतदानाची साद

धैर्यशील माने यांचा दौरा; कार्यकर्त्यांकडून आढावा

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व खासदार धैर्यशील माने यांचा सकाळी आठ वाजता संपर्क दौरा सुरू झाला की सांयकाळी महत्त्‍वाच्या गावात जाहीर सभेनंतर दौऱ्याची सांगता होते. गावातील ग्रामस्थांशी थेट संवाद साधतांनाच राजकीय प्रभाव असलेल्या व्यक्तींची भेट घेऊन आशीर्वाद घेण्यास ते विसरत नाहीत. रखरखत्या उन्हात त्यांच्या वाहनांचा ताफा गावात पोहोचला की निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल तयार होतो. ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना मतदानाची साद घातली जाते.

वाळवा तालुक्याच्या गावांतील प्रचार दौऱ्यासाठी सकाळी ८ वाजता त्यांच्या कोल्हापुरातील रुईकर कॉलनीतील निवासस्थानी पोहोचलो. त्यांना भेटण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत गेली. प्रत्येकांशी त्यांनी सहजपणे संवाद साधला. एकजण मुलीची पत्रिका देण्यासाठी आले होते. वेगवेगळ्या भागांतून आलेले काही कार्यकर्ते होते. त्यांनी आपल्या भागातील प्रचार यंत्रणेची माहिती दिली. तासाभरानंतर बाहेर पडलो. पेठवडगावमार्गे सांगली जिल्ह्यात प्रवेश केला.
पहिली प्रचार बैठक कारंदवाडीत झाली. मुख्य मार्गावर एक कार्यकर्ता वाट पाहत थांबला होता. माने यांच्या वाहनांचा ताफा त्याच्‍या पाठोपाठ बैठकीच्या ठिकाणी पोहचला. महिलांनी औक्षण केल्यानंतर ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधला. गावांत यापूर्वी दहा वर्षांत मागच्या खासदारांनी केलेली विकासकामे आणि आपल्या कालावधीत झालेल्या विकासकामांची माहिती त्यांनी दिली. दहा-पंधरा मिनिटानंतर माने यांचा प्रचाराचा ताफा पुढील गावांकडे रवाना झाला.
पुढे मिरजवाडी, मर्दवाडी, तुजारपूर, गाताडवाडी, गोटखिंडी, बावची, पोखर्णी, नागाव, फाळकेवाडी, काकाचीवाडी, रोझावाडी, बागणी, शिगाव आस गावांचा दौरा झाला. आष्टा प्रचार कार्यालयास धावती भेट दिली. बावची येथे एका कार्यकर्त्यांने जेवण्याची व्यवस्था केली होती. तेथे माने यांनी कार्यकर्त्यांसमवेत भोजन घेतले. कोरोनामुळे मिळालेला कमी कालावधी व त्यानंतरही प्रत्येक गावाला दिलेला निधी याचा आढावा माने यांनी घेतला. न मिळालेल्या गावांना दुप्पट निधी देण्याची ग्वाहीही त्यांनी बैठकीत दिली.
प्रचारात सुसूत्रता राहण्यासाठी प्रत्येक भागात समन्वयक नियुक्त केला आहे. त्यामुळे प्रत्येक गावात पुढे जाऊन प्रचाराच्या बैठकीची तयारी करण्यात येत होती. वातावरणात कमालीचा उष्मा असतानाही डोक्यावर धनुष्यबाण चिन्ह असलेली भगवी टोपी, गळ्यात स्कार्प, खिशाला चिन्हाचा बिल्ला लावलेले कार्यकर्त्यांचा वेगळाच उत्साह दिसून येत होता. गावांचा दौरा संपल्यानंतर ज्येष्ठ नेते आण्णासाहेब डांगे यांच्यासह पेठवडगाव येथे मान्यवरांची भेट घेऊन राजकीय परिस्थितीवर चर्चा केली. त्यानंतर वाठार व शिरोली येथील जाहीर सभांना उपस्थित राहून रात्री दहानंतर माने यांचा ताफा पुन्हा निवासस्थानी पोहोचला.
-------
दृष्टिक्षेपात दौरा...
* कार्यकर्त्याच्या घरीच नाष्टा करतात
* एखाद्या गावांतच जेवणाची व्यवस्था
* कार्यकर्त्यांसोबत जेवणाचा आस्वाद
* युवा वर्गाकडून सेल्फीसाठी आग्रह
* उन्हाच्या झळा असतानाही उत्साह कायम
------------
प्रचारातील मुद्दे
* मतदारसंघातील प्रत्येक गावाला निधी दिला
* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे निधी मिळाला
* निधी दिला, आता मतदानाच्या रूपांने शाबासकी द्या
* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाची प्रगती
* उद्योग वाढीतून रोजगार निर्मिती करणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी! भिवंडीत १० किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा, १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल ३ तास

Asian Games 2026: भारताविरुद्धच्या फायनलमध्ये इराणच्या खेळाडूंचे वागणे संशयास्पद; चौकशी झाली तर अधिकाऱ्यांसह सारेच अडकणार, नेमकं काय झालंय?

MGNREGA History : मागेल त्याला काम ते सांगलीच्या सुपुत्राची दूरदृष्टी; एसटीच्या 15 पैशांच्या अधिभारातून कशी उभी राहिली देशाची 'रोजगार हमी योजना'? एका पत्राने बदलला महाराष्ट्राचा इतिहास

Latest Marathi News Live Update : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात मनसे-ठाकरे गटाचा ४ ऑक्टोबरला संयुक्त मोर्चा

Adul Ganesh Mandal: डिजेचा खर्च टाळून गणेश मंडळाची शाळेला ५० हजारांची मदत

SCROLL FOR NEXT