कोल्हापूर

मुक्त सैनिक वसाहतीत दोन घरफोड्या

CD

80585
...

मुक्तसैनिक वसाहतीत दोन घरफोड्या
बंद बंगल्यांतून दागिने चोरीस ः लाखाच्या ऐवजावर डल्ला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ ः मुक्तसैनिक वसाहत परिसरात बंद बंगल्यांचे दरवाजे उचकटून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा लाखाचा ऐवज चोरून नेला. उच्चभ्रू लोकवस्तीमधील इमारतींमध्ये झालेल्या चोऱ्यांनी स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यशोदा पार्कातील बंद फ्लॅटमधून चांदीचा ६० हजारांचा ऐवज, तर लक्ष्मीनारायणनगरातील बंद बंगल्यातून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली आहे.
मुक्तसैनिक वसाहत येथील यशोदा पार्कमधील सागर सहदेव कांबळे (वय ३०) यांना काही महिन्यांपूर्वीच नवीन नोकरी लागली आहे. १० एप्रिलला पत्नी, आईसोबत ते नोकरीच्या ठिकाणी गेले होते. शनिवार आणि रविवारची सुटी असल्याने ते २७ एप्रिलला कोल्हापुरात परतले. घरी आले असता दरवाजाचा कडी कोयंडा तोडल्याचे दिसून आले. चोरट्याने घरातील बेडरूममधील कपाटातील १० चांदीचे कॉईन, चांदीचे पैंजण, चांदीचे छल्ले १४० ग्रॅम, चांदीचा मेखला २०० ग्रॅम, जोडवी चार नग, कुंकवाचे करंडे तीन नग, मोत्यांचा हार, महागडा गॉगल, मोबाईल हॅन्डसेट असा सुमारे ६० हजारांचा ऐवज चोरून नेला.
याच परिसरातील लक्ष्मी नारायणनगरात राहणारे डॉ. समीर बाबूलाल शाह (वय ४५, शोभा बंगलो) कामानिमित्त दोन दिवस शहराबाहेर गेले होते. रविवारी सायंकाळी परतले असता चोरट्याने लॉक तोडून घरात प्रवेश करत बेडरूममधील कपाटातील एक तोळ्यांचे सोन्याचे वळे, मुलाची स्कूल बॅग चोरून नेल्याचे समोर आहे. डॉ. शाह यांचा गांधीनगर येथे दवाखाना आहे. चोरीची फिर्याद त्यांनी शाहूपुरी पोलिसांत दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT