कोल्हापूर

इचलकरंजीत चार अनोखी मतदान केंद्रे

CD

मतदान वाढीसाठी इचलकरंजीत अनोखा फंडा
वेगवेगळी चार प्रकारची मतदान केंद्रे : प्रांताधिकारी मौसमी चौगुलेंचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २९ : लोकसभा निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रथमच दिव्यांग मतदान केंद्राचा समावेश केला आहे. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले यांच्या पुढाकाराने प्रथमच चार नवीन मतदान केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे.
----
-पिंक पोलिंग स्टेशन ः येथे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांसह सर्व महिलांचा समावेश असणार आहे. हे देशभक्त बाबासाहेब खंजिरे नाईट कॉलेज पूर्व-पश्चिम इमारत, पूर्वेकडून खोली क्र. ८ मध्ये असणाऱ्या केंद्र क्र. १३० मध्ये उभारण्यात येणार आहे.

-दिव्यांग पोलिंग स्टेशन ः येथील सर्व अधिकारी कर्मचारी दिव्यांग असणार आहेत. हे तात्यासाहेब मुसळे विद्यालय पूर्व-पश्चिम इमारतीमध्ये केंद्र क्र. १८५ येथे असणार आहे.

-युथ पोलिंग स्टेशन ः नोकरीमध्ये नव्याने भरती झालेल्या युवा कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. हे महात्मा गांधी कन्या विद्यामंदिर महापालिका शाळा क्र. १८ खोली क्र. १ मध्ये केंद्र क्र. २३८ हे असणार आहे.

- मॉडेल पोलिंग स्टेशन ः सर्व सोयी सुविधांनीयुक्त तसेच आदर्श असे हे केंद्र दोन ठिकाणी असेल. हे बालाजी विद्यालय-ज्युनिअर कॉलेज पूर्व-पश्चिम इमारत, पश्चिमेकडून खोली क्र. ५ मध्ये केंद्र क्र. १४५ आणि व्यंकटराव हायस्कूल उत्तरेकडील जुनी इमारत पूर्व बाजू हे केंद्र क्र. २१२ येथे असणार आहे.
--------------------------------
चार हजार ४७ नव मतदार
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदार संख्येने तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. यंदा ८५ वर्षांवरील १३७ व दिव्यांग १२ असे १४९ मतदार घरामधून मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात १ जानेवारी ते २३ एप्रिल अखेर चार हजार ४७ नव मतदार नोंदणी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: अंगणवाडी सेविका आईच्या Gen Z लेकाने बदलले कुटुंबाचे नशीब; UPSCत ५७४ वा क्रमांक मिळवत झाला IPS, सर्व भावूक

‘आराधी आलाय नवा ग नवा’ ऐश्वर्या नारकर अन् तितीक्षा तावडेंचा धमाकेदार डान्स, नेटकरी म्हणाले... ‘एक स्वामिनी तर दुसरी दामिनी…’ Video

Rajya Sabha Candidates: राज्यसभा निवडणुकीत भाजपचा सस्पेन्स संपला; दोन राज्यांत उमेदवारांची घोषणा, कोण आहेत चेहरे? एक तर अभिनेत्री

PM Kisan: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा २४वा हप्ता कधी येणार? नवी अपडेट समोर

Prithviraj Chavan : ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देऊन चालणार नाही, तर त्यांना...; पृथ्वीराज चव्हाणांचे घणाघाती आरोप, फौजदारी कारवाईचीही मागणी

SCROLL FOR NEXT