कोल्हापूर

एमटीएलटीएच्या क्रमवारीत जान्हवी चौगुले ‘टॉप १०’मध्ये

CD

80493
जान्हवी चौगुले
................
एमटीएलटीएच्या क्रमवारीत
जान्हवी चौगुले ‘टॉप १०’मध्ये

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २९ : महाराष्ट्र राज्य टेनिस संघटनेने (एमएसएलटीए) राज्यातील टेनिस खेळाडूंची क्रमवारी नुकतीच जाहीर केली. त्यामध्ये इचलकरंजीच्या जान्हवी चौगुलेचा १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पहिल्या दहा क्रमांकांत समावेश करण्यात आला. जान्हवीच्या या कामगिरीने वस्त्रनगरीची मान उंचावली आहे.
इचलकरंजी टेनिस असोसिएशनच्या क्रीडांगणावर जान्हवी सराव करीत असून, विविध स्पर्धांमध्ये नियमित सहभाग घेत आहे. जान्हवीने राज्य संघटनेने पुरस्कृत केलेल्या पुणे शहर व जिल्हा टेनिस चॅम्पियनशिप (बालेवाडी) पुणे, ऑल इंडिया रँकिंग सेरीज, नव सह्याद्री क्रीडांगण, पुणे, ओम दळवी स्मृती टेनिस चॅम्पियनशिप (औंध), पुणे आदी स्पर्धांत अंतिम स्पर्धेपर्यंत मजल मारली. जान्हवीला तिच्या यशाविषयी विचारले असता तिने, कठोर मेहनत, नियमित सराव आणि अधिकाधिक स्पर्धांत सहभाग ही यशाची त्रिसूत्री असल्याचे सांगितले. तिला सिराज शेख, शीतल भोसले, इचलकरंजी टेनिस असोसिएशनचे सचिव अजित कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! नवं मेट्रो स्टेशन सुरू होणार; अंधेरी ते मानखुर्द मेट्रो लाईन कशी असणार? जाणून घ्या मार्ग आणि स्टेशन्स...

मोहम्मद शमी, इशान किशनसह ५ मोठ्या खेळाडूंना BCCI ने वार्षिक करारातून वगळले! जाणून घ्या त्यामागचं कारण

Chandrapur Mayor : चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर भाजपचा महापौर, काँग्रेसला मोठा धक्का; पडद्याआड नेमकं काय घडलं ?

EPFO 3.0 : PF काढणं झालं सोपं! घरबसल्या UPI ने काढा पैसे; आणखी कोणत्या सुविधा? कधीपासून करता येणार व्यवहार? जाणून घ्या सर्व माहिती

Valentines Day: प्रपोजसाठी वाघोबालाही करावी लागते वणवण अन् लावतात जीवाचीही बाजी; वाघिणीला कसं करतात इम्प्रेस?

SCROLL FOR NEXT