कोल्हापूर

संवाद कौशल्यावरच संस्थेची प्रगती

CD

GAD294.JPG
80523
गडहिंग्लज : रवळनाथ हौसिंग फायनान्समध्ये आयोजित व्याख्यानात हेमंत बागडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी एम. एल. चौगुले, डॉ. आर. एस. निळपणकर उपस्थित होते.
----------------------------------------------
संवाद कौशल्यावरच संस्थेची प्रगती
हेमंत बागडे : गडहिंग्लजला ‘रवळनाथ’मध्ये व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : कुशल कर्मचारी, त्यांचा जनसंपर्क व संवाद कौशल्‍य यावरच संस्थेची प्रगती शक्य आहे. यामुळे कर्मचाऱ्यांनी ही कौशल्ये आत्मसात करायला हवीत, असा सल्ला पुण्याच्या कॉसमॉस बॅंकेचे निवृत्त अधिकारी व रवळनाथ, पुणे शाखेचे सल्लागार हेमंत बागडे यांनी दिला.
श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आयोजित बॅंकिंग क्षेत्रासंबंधी मार्गदर्शन व्याख्यानात ते बोलत होते. रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले अध्यक्षस्थानी होते. चौगुले म्हणाले, ‘संस्थेच्या प्रगतीत कर्माचारी महत्त्‍वाचा घटक आहे. त्यांच्याकडून प्रभावी काम होण्यासाठी संस्था वेळोवेळी प्रशिक्षण वर्ग घेत असल्याने त्यांच्या ज्ञानात भर पडते.’ बागडे यांचा सत्कार चौगुले यांच्या हस्ते करण्‍यात आला. २०२३-२४ या वर्षातील शाखानिहाय कार्याचा अहवाल सादर केला. २०२४-२५ साठी ५०० कोटींच्या ठेवीचे उद्दिष्‍ट, संकल्प व गतसालातील ग्रामीण व शहरी भागातील सर्वोत्कृष्ठ शाखा म्हणून कुडाळ व गडहिंग्लज सुविधा केंद्राची घोषणा केली. यावेळी संचालक महेश मजती, मीना रिंगणे, आदी उपस्थित होते. डी. के. मायदेव यांनी स्वागत केले. श्वेता टोणण्णावर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक डॉ. आर. एस. निळपणकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Dubai Flights Suspended : इस्रायल-इराण युद्धाचा फटका ! पुणे-दुबई विमानसेवा सलग चौथ्या दिवशी बंद, प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Bhagoria Festival : ५०० वर्षे जुनी टिंडर होळी! पोरगी पसंत पडली तर थेट पळवून नेण्याची परंपरा; या गावात भरतो 'प्रेमाचा मेळा'

Former ZP Member Assault Pune : पुण्यात माजी जिल्हा परिषद सदस्याकडून मोठ्या भावाला मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

Latest Marathi News Live Update : एसबीएल आयुध कारखाना स्फोट प्रकरणात 11 जण अटकेत, मुख्य आरोपी आलोक चौधरी फरार

'धुवून टाक...' रितेशच्या गाण्यावर कमळीचा भन्नाट डान्स, सोशल मीडियावर Viral Video

SCROLL FOR NEXT