कोल्हापूर

शेकापतर्फे जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान

CD

80544

‘शेकाप’तर्फे जवानांच्या कुटुबीयांचा सन्मान

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या अॅड. उज्ज्वला कदम यांच्या तृतीय स्मृतीदिनानिमित्त शहर कार्यालयात भारतीय सैन्य दलाच्या सेवेत कार्यरत असणाऱ्या आणि शहीद जवानांच्या वीरमाता, वीर पत्नींचा ‘उज्ज्वल गौरव पुरस्कार’ देऊन सन्मान केला.
शहीद सौरभ कुंभार यांच्या मातोश्री वीरमाता संगीता कुंभार, शहीद शैलेंद्र पाटील यांच्या वीरपत्नी स्नेहल पाटील, ऑनररी कॅप्टन शिवाजी शेटके यांच्या पत्नी सपना शेटके, भारतीय नौदल सेवेत कार्यरत असलेल्या सानिका नारे यांच्या मातोश्री रूपाली नारे यांचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान झाला.
महिला जिल्हाध्यक्षा वैशाली सूर्यवंशी यांनी उज्ज्वला ताईच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचे अपूर्ण कार्य महिला आघाडी पुढे चालू ठेवेल, असे सांगितले. देशसेवेचे व्रत घेतलेल्या जवानांना त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा असतो, म्हणूनच ते देशसेवेचे कार्य करत असतात म्हणून त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान होणे गरजेचे आहे, असे सांगितले.
प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी पुरोगामी विचार आणि सत्यशोधक विचार प्रत्येक महिलेने अंगिकारले पाहिजे. महिलेने सक्षम बनले पाहिजे. उज्ज्वला कर्तव्यदक्ष आणि नि:स्वार्थी कार्यकर्ती होती. तिने हाती घेतलेले कार्य पूर्ण करण्यावर भर दिला, असे त्यांनी सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्या लता कांदळकर यांनी महिलांनी सक्षम होऊन उज्ज्वलाचे अपूर्ण कार्य अखंड पूढे चालू ठेवले तरच उज्ज्वलाला खऱ्या अर्थाने आदरांजली मिळेल, असे सांगितले.
गीता जाधव, अॅड. सुजाता कदम, राजश्री ढवण, रुपाली नारे, चंद्रकांत खोंद्रे, मधुकर हरेल यांनी उज्ज्वलाच्या स्मृतींना उजाळा दिला. शीतल पोवाळकर यांनी सूत्रसंचालन तर प्रिया जाधव यांनी आभार मानले. बाबूराव कदम, गीता कदम, दिलीपकुमार जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, सचिन जाधव, धोंडीराम हवालदार, शाहिर रंगराव पाटील, योगित पोवार, माधवी हरेल, कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: प्रयोग थांबणार अन् न्यूझीलंडविरुद्धच दिसणार भारताची World Cup ची संभावित प्लेइंग-११? कर्णधार शुभमन गिलचे संकेत

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

SCROLL FOR NEXT