कोल्हापूर

मोफत स्त्री रोग निदान चिकित्सा शिबीर

CD

80553
कोल्हापूर : जैन मठ येथे मोफत स्त्री रोग निदान चिकित्सा शिबीराच्या उद्‌घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर.

कोल्हापुरात रुग्णालय सुरू करण्याचा मानस
लक्ष्मीसेन महास्वामी : जैन मठात स्त्री रोग निदान चिकित्सा शिबीर
कोल्हापूर, ता. २९ : ‘‘डॉक्टरांनी आपल्या आयुष्यातील काही वेळ रुग्णांची सेवा मोफत करण्यासाठी काढावा. रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा मानून सेवाभावी वृत्तीने रुग्णांच्या व्याधी दूर कराव्यात. महावीर संस्था सेवाभावी तज्ज्ञ डॉक्टर आणि जैन लक्ष्मीसेन मठातर्फे कोल्हापुरात सुसज्ज रुग्णालय सुरू करण्याचा मानस आहे,’’ असे स्वस्तीश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी व्यक्त केला.
जैन मठ येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी लक्ष्मीसेन महास्वामी बोलत होते. डॉ. सुकुमार बिंदगे यांनी स्वागत केले. शिबीराचे उद्‌घाटन राजर्षि शाहू छत्रपती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केले. डॉ. मोरे यांनी ‘सीपीआर’ सदैव जनतेसाठी रात्रंदिवस खुले असून जास्तीत जास्त रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
जैन बोर्डिंगचे अध्यक्ष सुरेश रोटे, भरत शेंडुरे यांनी हास्याचे आरोग्यास कसे लाभ होतात याची माहिती दिली. डॉ. सुश्मीता सनकी जैन यांनी महिलांची गरोदरपणात घ्यावयाचा आहार-विहार, योगा, आत्मविश्‍वास, प्रसुती सुलभ होण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.
शिबीरात १५० महिलांची तपासणी झाली. त्यांना वंध्यत्व चिकित्सा आणि सुलभ प्रसुती याबाबत समुपदेश करण्यात आले. डॉ. पद्मश्री जवकर-बिंदगे, डॉ. संदेश आडमुठे, डॉ. उद्यम व्होरा, डॉ. विलास महाजन, डॉ. राजेश कुंभोजकर, डॉ. धवल मालगावे, डॉ. उदय मुधाळे, डॉ. सुहास शहा, डॉ. सनकी जैन, डॉ. अंजली माणगावे यांसह अन्यांनी रुग्णांची तपासणी केली. डॉ. श्रेयांस सनकी जैन, डॉ. मिताली मालगावे, डॉ. मानसी पाटील, विद्या पाटील, स्वस्तीका भिवटे यांचा सत्कार लक्ष्मीसेन महास्वामींच्या हस्ते करण्यात आला.
वैभव नागजकर शहा यांनी सुत्रसंचलन केले. शांतीसागर भिवटे, ज्योती शेट्टी, अनिता पलसे, महावीर लगारे, शांतीनाथ पाटील, सुरेश मगदूम, आण्णा कापसे, प्रकाश जाधव, संजय कापसे, स्वप्नील भोसले, एन. एन. पाटील, प्रमोद चौगुले यांनी सहकार्य केले. डॉ. धवल मालगावे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT