कोल्हापूर

इचल : चर्चासत्र

CD

विषारी, विखारी प्रचाराला
वेळीच रोखण्याची गरज

समाजवादी प्रबोधिनीच्या चर्चासत्रात सूर

इचलकरंजी, ता. २९ ः लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये विविध समाज माध्यमांमध्ये आणि जाहीर भाषणांमध्ये होणारा प्रचार सत्यापेक्षा असत्याच्या अंगाने वेग घेतो आहे. तो विषारी व विखारी होत आहे. त्याला वेळीच आवर घातला गेला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भविष्यात देशाला भोगावे लागतील, असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात ‘प्रचारातील वास्तविकता व अवास्तविकता’ विषयावरील चर्चेतून पुढे आले. चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, प्रा. रमेश लवटे, तुकाराम अपराध, पांडुरंग पिसे, शकील मुल्ला, सचिन पाटोळे, शहाजी धस्ते, देवदत्त कुंभार, मनोहर जोशी आदींनी सहभाग घेतला.
एका संगणक सुरक्षा कंपनीच्या अहवालानुसार, देशातील ७५ टक्के लोकांपर्यंत समाजमाध्यमांतून धादांत खोट्या स्वरूपाची माहिती पोहचत आहे. निरनिराळ्या राजकीय पक्षांचे आयटी सेल हा खोटेपणाचा आजार खरेपणाने पसरवित आहेत. सत्यता न पडताळता माहिती पुढे प्रसारित करत राहणे योग्य नाही. त्यामुळे समाजमाध्यमातून वस्तुस्थितीची तपासणी करण्याकडेही गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकासासाठी वापर करण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे नैसर्गिक बुद्धिमत्ता विकृतीकडे नेणे फारच घातक ठरेल, अशी भीती चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

जीवनमान-जीवनभान : व्यायामाने जपूया मानसिक आरोग्य

SCROLL FOR NEXT