कोल्हापूर

शरदपवार, उद्धव ठाकरे सभा - पाहणी

CD

फोटो नितीन
----------
गांधी मैदानातील पवार, ठाकरेंच्या
सभेच्या नियोजनासाठी पाहणी

सभा यशस्वी करण्याचे आवाहन : सतेज पाटील, मालारोजीराजेंनी घेतली बैठक

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारासाठी एक मे रोजी खासदार शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘शिव-शाहू निर्धार’ सभा होत आहे. गांधी मैदानात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या सभेच्या नियोजनाची पाहणी आज करण्यात आली. यावेळी आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार मालोजीराजे यांनी सभा यशस्वी करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांची बैठक घेऊन केले.
आमदार पाटील यांच्यासह माजी आमदार मालोजीराजे, आमदार जयश्री जाधव यांनी सभेच्या नियोजनाबाबत कार्यकर्त्यांना सूचना केल्या. सभेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी, पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सभेसाठी उपस्थित ठेवावे, येणाऱ्या लोकांकरिता वाहन पार्किंग व्यवस्था, बसण्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने करावी. गेले २५ दिवस सर्वजण प्रचारात आहोत. सोशल मीडियावरून आता काहीही अफवा पसरविण्यात येतील. मात्र, येणाऱ्या काळात सर्वांनी दक्ष राहून काम करूया. आपापल्या भागातील लोकांपर्यंत या सभेची माहिती पोहोचवा त्यांना निमंत्रित करा, अशाही सूचना केल्या.
सभेसाठी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्यासह इंडिया आघाडीतील, घटक पक्षातील प्रमुख नेते व्यासपीठावर असणार आहेत. सभेपूर्वी कार्यकर्त्यांनी गांधी मैदानात हजर राहावे, अशा सूचना माजी आमदार मालोजीराजे यांनी केल्या.
यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर प्रमुख आर. के. पोवार, शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, माजी नगरसेवक आर.डी. पाटील, राजू लाटकर, सतीशचंद्र कांबळे, दिलीप पवार, चंद्रकांत यादव, सुभाष जाधव, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live: नाद करा, पण अजिंक्यचा कुठे! हार्दिकला हाणले सलग २ खणखणीत षटकार, रहाणेचे वादळी अर्धशतक Video पाहाच...

एकला चलो रे! काँग्रेसची बंगालमध्ये २९४ पैकी २८४ जागांवर उमेदवारांची घोषणा, यादी आली समोर

इराणवर अण्वस्त्र हल्ला झाल्यास भारतावर परिणाम होईल का? कोणत्या देशांना सर्वाधिक धोका?

Baramati SDM Transfer: बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांची बदली; मिरजचे उत्तम दिघे तात्काळ कार्यभार स्वीकारणार

Raigad Pali Road Hazard: पालीतील हटाळेश्वर चौकात प्रचंड खड्डा; भाविक-स्थानिकांचा नगरपंचायतीवर संताप, अपघातांचा धोका वाढला

SCROLL FOR NEXT