कोल्हापूर

महापालिकेच्या कार्यालजवळ कचरा कोंडाळा

CD

80638
कोल्हापूर : राजारामपुरीतील पोपटराव जगदाळे हॉलसमोरील रस्त्यावर कोंडाळा तयार झाला आहे.

पालिकेच्या कार्यालयाजवळ कचरा कोंडाळा
कोल्हापूर, ता. २९ ः महापालिकेने शहरातील रस्त्यावरील कचरा कोंडाळे बंद केलेले असताना राजारामपुरीतील महापालिकेच्याच पोपटराव जगदाळे हॉलसमोर कोंडाळा तयार केला आहे. महापालिकेच्या डांबरीकरणाची यंत्रणा तिथे अस्ताव्यस्त टाकल्याने हा कोंडाळा तयार झाला आहे.
रस्त्यावर कचरा टाकला जाऊ नये म्हणून महापालिकेने कोंडाळे काढून टाकले. टिपरद्वारे कचरा संकलन होऊ लागले. पण टिपरचे नियोजन विस्कटले की घरांमध्ये कचरा साठून राहू लागल्याने तो रस्त्यावर टाकला जाऊ लागला. ग्रामीण भागातील जनताही शहरात येऊन कचरा टाकत होती. यामुळे महापालिकेकडे काही महत्त्‍वाच्या ठिकाणी कोंडाळे बसवा किंवा ट्रॅक्टर ठेवा, अशी मागणी अनेकवेळा केली. त्यानुसार कार्यवाही केली नाही. पण त्याच महापालिकेच्या यंत्रणेने कोंडाळा तयार केल्याची स्थिती राजारामपुरीत दिसत आहे.
राजारामपुरी विभागीय कार्यालयासमोर असलेल्या राजारामपुरी उद्यानात पोपटराव जगदाळे हॉल आहे. त्याच्या दक्षिणेकडील रस्त्याचा कोपरा कोंडाळा बनला आहे. तिथे महापालिकेच्या डांबरीकरणाच्या कामातील मशीनरी आहे. त्याजवळच डांबराची पिंपे अस्ताव्यस्त पडली आहेत. त्यामुळे रस्ता अडला असून त्या अडलेल्या जागेत वेगवेगळा कचरा टाकण्यात आला आहे. त्यामुळे हा कोपरा म्हणजे कोंडाळाच बनला आहे. ज्या प्रशासनाने कोंडाळे काढले, त्यांनीच कोंडाळा तयार केल्याची बाब नागरिकांना खटकत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT