कोल्हापूर

‘कोल्हापूर’मधून मंडलिक तर ‘हातकणंगले’तून सरुडकर खर्चात पुढे

CD

प्रचार खर्चात मंडलिक, सरुडकर पुढे
लोकसभा निवडणूक ः पहिल्या टप्प्यातील पडताळणी पूर्ण; अजून दोन टप्पे बाकी

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २९ : लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या खर्चावर निवडणूक विभागाचे बारीक लक्ष आहे. निवडणूक यंत्रणेतील विविध पथकांकडून या खर्चाचा आढावा घेतला जात आहे. तसेच उमेदवारांकडूनही दैनंदिन खर्च सादर केला जात आहे. आतापर्यंत उमेदवारांकडून सादर केलेल्या खर्चाची पहिल्या टप्प्यातील पडताळणी पूर्ण झाली आहे. यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा खर्च २४ लाख ५९ हजार ५७४ रुपये झाला आहे, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना (ठाकरे गट) इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांचा खर्च ११ लाख ३३२ रुपये झाला आहे. दोघेही खर्चात पुढे आहेत

कोल्हापूरमधून कॉंग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा खर्च १९ लाख ९६ हजार ३२५ रुपये इतका झाला आहे, तर हातकणंगलेतून शिवसेना (शिंदे गट) महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा खर्च ९ लाख ९९ हजार ४४२ रुपये झाला आहे.
भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना खर्च मर्यादा ९५ लाख रुपये इतकी दिली आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून चेतन आर. सी. व हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च म्हणून हरिषा वेलंकी यांची नियुक्ती केली आहे. निवडणूक खर्च परीक्षण व व्यवस्थापन नोडल अधिकारी म्हणून अतुल आकर्डे आहेत. त्यांच्याकडून उमेदवारी अर्ज भरल्यापासून म्हणजे १२ एप्रिलपासून उमेदवारांच्या खर्चाचा आढावा घेतला जात आहे. आतापर्यंत खर्चाची पहिल्या टप्प्यातील पडताळणी पूर्ण झाली आहे. अजून दोन टप्प्यात खर्चाची पडताळणी केली जाणार आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
उमेदवार* खर्च (१२ एप्रिल ते २५ एप्रिलपर्यंत)
संजय मंडलिक*२४ लाख ५९ हजार ५७४ रुपये
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज*१९ लाख ९६ हजार ३२५ रुपये
डॉ. सुनील पाटील*२ लाख ६४ हजार ७० रुपये
बी. टी. पाटील *२ लाख ५४ हजार ८० रुपये

हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
उमेदवार*खर्च (१२ एप्रिलपासून २३ एप्रिलपर्यंत)
सत्यजित पाटील-सरुडकर* ११ लाख ३३२ रुपये
धैर्यशील माने*९ लाख ९९ हजार ४४२ रुपये
राजू शेट्टी *८ लाख १० हजार ५९ रुपये
डी. सी. पाटील*१ लाख ७८ हजार १९५ रुपये

चौकट
खर्च सादर न केलेल्या उमेदवाराला नोटीस
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेंद्र कोळी यांनी अद्याप खर्च सादर केलेला नाही. त्यामुळे निवडणूक विभागाकडून त्यांना खर्च सादर करण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT