कोल्हापूर

विकासाभिमुख खासदार मानेंना जनता समर्थपणे साथ देईल

CD

80655
......
धैर्यशील माने यांना जनता साथ देईल

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे; चंदूर येथे प्रचार मेळावा

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २९ : ‘कोरोनाच्या काळात खंड पडला असतानाही उरलेल्या दोन वर्षांत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून खासदार धैर्यशील माने यांनी विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. मतदारसंघात विविध विकास कामांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आठ हजार २०० कोटी, तर चंदुर गावासाठी २३ कोटी १२ लाख २८ हजार रुपयांचा निधी त्यांनी दिला आहे. अशा विकासाभिमुख खासदाराला पुन्हा खासदार करण्यासाठी जनता समर्थपणे साथ देईल’, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
चंदुर (ता. हातकणंगले) येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. ‘मतदारसंघात महायुती मित्रपक्षांची ताकद मोठी आहे. महायुतीचे सर्वच नेते आता खासदार माने यांच्या प्रचारात जोरदारपणे उतरले आहेत. त्यामुळे त्यांचे गतवेळचे लीड डबल होईल. मोदींचे हात बळकट करण्यासाठी खासदार माने यांना मताधिक्य द्या’, असे आवाहन खासदार डॉ. शिंदे यांनी केले. यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांचेही भाषण झाले.
पंचायत समितीचे माजी सभापती महेश पाटील यांनी स्वागत केले. माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच स्नेहल कांबळे, उपसरपंच ललिता पुजारी, धुळाप्पा पुजारी, भाऊसाहेब पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंडियन प्रीमिअर लीग अनधिकृत? BCCI विरोधात केरळ उच्च न्यायालयात विचित्र याचिका दाखल; २८ पासून लीग सुरू होणार की नाही?

हर हर महादेव! 'राजा शिवाजी'चा टीझर प्रदर्शित, जिनिलिया साकारतेय 'ही' महत्वाची भूमिका, रितेशला पाहून सगळेच झाले थक्क

Horoscope : गुढी पाडव्यानानंतर 'या' 3 राशींना धनलाभ सुरू; दर महिन्याला मिळेल नवी खुशखबर, साडे तीन मुहूर्त काळात नशिबाचे चक्र फिरणार

Latest Marathi News Live Update : महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर करुणा मुंडे यांचा गंभीर आरोप

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

SCROLL FOR NEXT