कोल्हापूर

‘महाराष्ट्र केसरी’सह ज्येष्ठ मल्लांनी ठोकला शड्डू

CD

‘महाराष्ट्र केसरी’सह ज्येष्ठ मल्लांनी ठोकला शड्डू

प्रमुख उमेदवारांच्या प्रचारार्थ कसली कंबर ः चर्चा पुण्यातील कृतज्ञता मेळाव्याची

सचिन भोसले, सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३० ः लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघे सहा दिवस उरले असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रमुख उमेदवारांचा आटापिटा सुरू आहे. त्यातून ‘महाराष्ट्र केसरी’सह ज्येष्ठ कुस्तीगीरही सुटलेले नाहीत. विशेष म्हणजे जुने ज्येष्ठ कुस्तीगीर श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या बाजूने, तर विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या बाजूने नव्या दमाचे कुस्तीगीर मैदानात उतरले आहेत.
कोल्हापूर हे कुस्तीसह फुटबॉल, नेमबाजी, जलतरण, रग्बी, क्रिकेट, बुद्धिबळ अशा एक ना अनेक खेळांत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविणारे माहेरघर मानले जाते. विशेषतः कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ हा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अधिपत्याखाली कार्यरत आहेत, तर काही तालमींचे वस्ताद आणि प्रशिक्षक नवीन महाराष्ट्र कुस्तीगीर महासंघाचे नेतृत्व मानतात. मात्र, यातील वैयक्तिक कारणांमुळे श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारार्थ ‘महाराष्ट्र केसरी’ विष्णू जोशीलकर, जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील आदी सक्रिय आहेत, तर कुस्तीगीर महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, संग्राम पाटील, राष्ट्रीय मल्ल सोनबा गोंगाणे आदी मंडळी खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ अग्रेसर आहे. त्यांच्यासह अनेक आजी-माजी ज्येष्ठ कुस्तीगीरही प्रमुख उमेदवारांच्या प्रचारार्थ कंबर कसून सभा, प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होत आहेत.
........
निवडणुका अन् मल्लांचा सन्मान
पुण्यातील सह्याद्री संकुलाचे विजय बराटे आणि ऑलिंपियन कुस्तीगीर काका पवार यांच्या पुढाकाराने आंबेगाव येथे चार दिवसांपूर्वी कुस्तीगीरांचा कृतज्ञता सोहळा झाला. यामध्ये राज्यातील शंभरहून अधिक महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, महाराष्ट्र चॅम्पियन, जुन्या कुस्तीगीरांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. परिषदेचे सर्वेसर्वा बाळासाहेब लांडगे प्रमुख उपस्थित होते. यात कोल्हापुरातील हिंदकेसरी दीनानाथसिंह, महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, नामदेव मोळे, संभाजी पाटील, संभाजी वरुटे, हिंदकेसरी विनोद चौगुले, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, विकी बनकर, किरण भगत, हिंदकेसरी संतोष वेताळ आदी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, संयोजकांनी सहभागी ज्येष्ठ मल्लांचा प्रत्येकी १५ हजार रुपये रोख देऊन यथोचित सन्मान केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्काराची चर्चा कोल्हापूरसह राज्यभरातील कुस्ती क्षेत्रात होत आहे.
..........
कोट
कुस्तीला संस्थानकालापासून राजाश्रय आहे. पूर्वीपासून श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांची आमच्यावर मर्जी असून, वैयक्तिक संबंधामुळे आम्ही त्यांच्या प्रचारार्थ सहभागी आहोत.
- विष्णू जोशीलकर, महाराष्ट्र केसरी
........
कोट
पूर्वीपासून खासदार संजय मंडलिकांशी माझे वैयक्तिक संबध असल्याने आपण त्यांच्या प्रचारार्थ सहभागी झालो आहोत.
- रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र कुस्तीगीर महासंघ
...............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : जरा 'बडबड' कमी कर... वीरेंद्र सेहवागचा KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाला, बच्चन, तेंडुलकर यांच्याकडून शिक

Kolhapur Hockey Player : अवघ्या २३ वर्षीय राज्यस्तरीय हॉकीपटूने घेतला गळफास, उपचारासाठी प्रयत्न केले पण...

अंकिता वालावलकरच्या आंब्याच्या पेट्या चोरीला; यूपीच्या कुरिअरवाल्याने पळवलं सामान; इतक्या हजारांचं नुकसान

MI vs RR Live: बाहेर एवढं थंड वातावरण कसं झालं? रोहित शर्माचा मजेशीर प्रश्न, तिलक वर्मा म्हणतो... Video; मॅचसाठी खेळाडू रवाना पण...

Latest Marathi News Live Update :: नाशिकच्या चांदवडमध्ये पाणीटंचाईने संतप्त ग्रामस्थांनी उद्रेक

SCROLL FOR NEXT