कोल्हापूर

निकाल मिळाला, विद्यार्थ्यांमध्ये आनंद पसरला

CD

80966
कोल्हापूर : जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांचा निकाल बुधवारी जाहीर झाला. गुणपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यी एकमेकांच्या गुणांची चर्चा करत शाळेतून बाहेर पडले. यावेळी काही आनंदी झाले, तर काहींनी नव्या उमेदीने गुणवत्तेचा संकल्प केला. वडणगे (ता. करवीर) येथील देवी पार्वती हायस्कूलसमोर बी. डी. चेचर यांनी घेतलेले छायाचित्र.

निकाल मिळाला, आनंद पसरला
शाळांत पालक-विद्यार्थ्यांची गर्दी; आता १५ जूनपासून शाळा;
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : महाराष्ट्र दिनी बुधवारी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये निकाल जाहीर करण्यात आला. गुणपत्रिका हातात पडल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आनंद पसरला. त्यांच्या आणि पालकांच्या गर्दीने शाळांचा परिसर गजबजला. शाळांना उन्हाळी सुटी संपल्यानंतर १५ जूनपासून भरणार आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर मतदान जागृतीबाबत शाळांच्या परिसरातून विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढली. मतदान जागृतीच्या अनुषंगाने घोषवाक्यांचे फलक घेवून आवाहन करत विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले होते. काही शाळांमध्ये मानवी साखळीही करण्यात आली. त्यानंतर इयत्तानिहाय विद्यार्थ्यांना निकालपत्राचे वाटप करण्यात आले. विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाबाबत उत्सुकता लागून राहिली होती. निकालपत्र हातात पडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पसरला. विशेष प्राविण्य श्रेणी, प्रथम, द्वीतीय, तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि त्यांच्या कॉलनी, अपार्टमेंटमध्ये पेढे वाटून आनंद व्यक्त केला. परीक्षा संपल्यानंतर जे विद्यार्थी सुटीसाठी परगावी गेले आहेत. त्यांचे निकालपत्र पालकांनी घेतले. दरम्यान, निकालपत्र वाटप केल्यानंतर शाळांतील सर्व शिक्षक, कर्मचारी त्यांच्या परिसरातील मतदारांकडून शपथपत्र, संकल्पपत्र भरून घेतले.
-----------------
‘स्टेटस’वर झळकली गुणपत्रिका
निकालपत्र घेवून आल्यानंतर बहुतांश विद्यार्थी आणि पालकांनी त्याची माहिती आपल्या अन्य नातेवाईकांना मोबाईलद्वारे दिली. काही पालकांनी त्यांच्या सोशल मिडियाच्या स्टेटस, डीपीवर पाल्याची गुणपत्रिका लावली होती. पाल्यांवर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Live Updates: "सरकार संवेदनाशून्य, भाजप मराठी माणसाचा खरा शत्रू" ; आदित्य ठाकरे यांचा घणाघात

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT