कोल्हापूर

सिंबायोसिस स्कूलमध्ये कुंभोजकरांचे व्याख्यान

CD

gad24.jpg
81015
हरळी बुद्रूक : सिंबायोसिस स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात नीलेश कुंभोजकर यांचा सत्कार डॉ. सतीश घाळी. शेजारी शिवराम कुलकर्णी, मिलिंद चौधरी, वहिदा मुल्ला उपस्थित होते.
--------------------------
सिंबायोसिस स्कूलमध्ये
कुंभोजकरांचे व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ : हरळी बुद्रूक (ता. गडहिंग्लज) येथील सिंबायोसिस स्कूलमध्ये सिंबायोसिस सोसायटीचे माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख नीलेश कुंभोजकर यांचे व्याख्यान झाले. करिअरच्या संधी याबाबत त्यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सिंबायोसिस एसएससीडीचे रजिस्ट्रार मिलिंद चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कुंभोजकर म्हणाले, ‘बदलत्या काळात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे. खेडेगावातील विद्यार्थ्यांच्या अंगी कौशल्य असते. मात्र, त्यांना म्हणावी तशी संधी उपलब्ध होत नाही. संधी मिळाली तर निश्चितच ते यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात.’ सिंबायोसिस शाळा व्यवस्थापन समितीच्या निमंत्रित सदस्यपदी निवड झाल्याबद्दल शिवराम कुलकर्णी यांचा सत्कार झाला. सिंबायोसिस व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. सतीश घाळी व शिवराम कुलकर्णी यांचीही भाषणे झाली. यावेळी रावसाहेब मुरगी, संतोष आंबी, राजेंद्र शेलार, अतुल अहिरे, अशोक पाटील आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका वहिदा मुल्ला यांनी स्वागत केले. कविता कागिनकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New aviation Rules For Pets : विमानात आता पाळिव प्राणी नेण्याबाबत नवीन सूचना जारी, हवाई वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना दिले नवे आदेश

New IPO: गॅस संकटात ऊर्जा क्षेत्रातील या कंपनीचा 1,100 कोटींचा IPO! किती गुंतवणूक करावी लागणार? काय आहे कंपनी? जाणून घ्या

यंदाचा गुढीपाडवा ठरणार 'या' चार राशींना भाग्यशाली; सुरू होणार सुवर्णकाळ पण या राशींनी राहा सावध

IPL 2026 : आधी, नो लूक षटकार... मग कॉलर टाईट... हार्दिक पांड्याचा माज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या चेंडूवर ठेचला Video Viral

Navi Mumbai: आदल्या दिवशी वाद; नंतर तलवार घेऊन तरुण हॉटेलमध्ये घुसला अन्... नवी मुंबईत मॅनेजरसोबत काय घडलं?

SCROLL FOR NEXT