कोल्हापूर

‘रवळनाथ’ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

CD

‘रवळनाथ’ कर्मचाऱ्यांच्या
महागाई भत्त्यात वाढ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २ ः श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कायम सेवेतील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात १० टक्के वाढ केली आहे. १ एप्रिल २०२४ पासून ही वाढ देण्यात येत आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली.
ते म्हणाले, ‘सभासदांचा विश्वास, कर्मचाऱ्यांचे सहकार्य व परिश्रमामुळे संस्थेची प्रगती अखंडित सुरू आहे. कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात वाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होणार आहे. वाढ केल्यामुळे कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. ३१ मार्च २०२४ अखेर संस्थेत १३५ कर्मचारी आहेत. एप्रिल २०१४ पासून कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाते. प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युईटी, पेन्शन, मेडिक्लेम, पगारी रजा, बोनस आदी लाभ दिले जातात. डॉ. आर. एस. निळपणकर, डॉ. दत्ता पाटील, डॉ. किरण पोतदार, प्रा. विजय आरबोळे, डॉ. मनोहर पुजारी, मीना रिंगणे, उमा तोरगल्ली, रेखा पोतदार, सीईओ डी. के. मायदेव, व्यवस्थापक शिवानंद घुगरे, प्रशासन अधिकारी सागर माने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: काव्या मारनच्या संघात ३००+ विकेट्स घेणारा खेळाडू दाखल; KKRनेही विदर्भच्या पोट्ट्यासाठी मोजले लाखो

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा ठाणेकरांना दिलासा! १०० कोटींची देणी थकीत, अनेक महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद; वाचा सविस्तर

Latest Marathi News Live Update : इगतपुरी तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची घटना

Australia Cricket: खेळपट्टी तयारीत लुडबुड नसणार; आर्थिक फटका बसल्यानंतर ऑस्ट्रेलियन मंडळाचा पवित्रा

Santwadi Leopard News: संतवाडीत बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद; जन्नुर तालुक्यातील घटना, शेतावर वनविभागाने पिंजरा लावला अन्..

SCROLL FOR NEXT