कोल्हापूर

चंबुखडी टाकीच्या पाईपला व्हॉल्व गळती

CD

व्हॉल्‍व्‍ह गळतीची डोकेदुखी
मुख्य जलवाहिनीचे जोड काम झाले तरी समस्या कायम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : शहरातील सी व डी वॉर्डसाठी पुईखडीवरून चंबुखडीला थेट जलवाहिनीचे पाणी नेणाऱ्या पाईपवरील व्हॉल्‍व्‍हची गळती डोकेदुखी ठरत आहे. मुख्य जलवाहिनीच्या जोडाचे काम झाले आहे. पण, ही गळती दुरुस्ती करावी लागणार असल्याने जलवाहिनी सुरू करण्यात आली नाही.
थेट पाईपलाईनचे पाणी आता केवळ सी व डी वॉर्डला देणे शिल्लक आहे. त्यासाठी पूर्वी शिंगणापूर योजनेतून अशुद्ध पाणी पुईखडीला नेणारी पाईप आता थेट पाईपलाईनचे शुद्ध पाणी पुईखडीवरून चंबुखडीला नेण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यासाठी फुलेवाडी जकात नाक्याजवळ त्या पाईपचा जोड चंबुखडीकडे जाणाऱ्या पाईपला देण्याचे काम बरेच दिवस चालले. तसेच चंबुखडी टाकीत पाणी टाकण्याचे कामही करण्यात आले. त्यानंतर गेल्या आठवड्यात ती पाईप स्वच्छ करण्यासाठी पाणी घेण्यात आले. या पाईपलाईनवरील दोन व्हॉल्‍व्‍हमधून गळती असून, तिची दुरुस्ती आवश्‍यक आहे. तरच या पाईपमधून पुरेसे पाणी चंबुखडी टाकीत मिळणार आहे. त्यासाठी एक दिवस पाणी बंद ठेवावे लागणार आहे. सध्या निवडणुकीमुळे ती दुरुस्ती पुढे ढकलली आहे. निवडणुकीनंतर ही दुरुस्ती करून घेतली जाणार आहे. यानंतर पुईखडीवरून शुद्ध पाणी चंबुखडी टाकीत टाकण्यात येणार आहे. यासाठी पुढील आठवडा जाण्याची शक्यता आहे.
--------------
चौकट
२६ कोटी आदा झाल्यानंतर योजना पूर्ण
थेट पाईपलाईन योजनेसाठी ४८८ कोटींचा निधी मंजूर होता. त्यातून टप्प्याटप्प्याने काम पूर्ण होईल त्याप्रमाणे ठेकेदार कंपनीला बिलाची रक्कम आदा केली जात आहे. आता कामाचा शेवटचा टप्पा बाकी असून, त्यानंतर २६ कोटींच्या आसपास रक्कम आदा केली जाणार आहे. काम पूर्ण झाल्यानंतर प्रशासकांच्या मंजुरीनंतर ही रक्कम दिली जाईल. त्यानंतर योजनेचे काम पूर्ण झाले, असे समजण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर पाच वर्षे देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदार कंपनीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापुरात विकृती वाढतेय! दागिन्यांसाठी नातवाने आजीला चहातून विष पाजलं; पोलिसांनी अवघ्या काही तासात लावला छडा

‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार मिथिला पालकर; साकारणार 'ही' भूमिका

Terrorist Junaid Ahmad : तुरुंगातील कैद्यांना भडकवणारा मास्टरमाईंड अद्याप मोकाट! दहशतवादी जुनैद अहमदला पकडण्यासाठी NIA कडून पाच लाखांचे रोख बक्षीस जाहीर

High Court Nagpur Bench: सासरच्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा वाढता ट्रेंड; नागपूर खंडपीठाचा कडक इशारा! काय होतं प्रकरण?

Kolhapur Foundries : कोल्हापुरात ‘ग्रीन कास्टिंग’चा पथदर्शी प्रकल्प; पश्चिम विभागाचे अध्यक्ष वीर अडवाणी, फाउंड्रीतील निर्यात वाढणार

SCROLL FOR NEXT