कोल्हापूर

माने टुडे

CD

81175
जयसिंगपूर : येथे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये अभिवादन करत असताना अभिनेते गोविंदा, शेजारी धैर्यशील माने, संजय पाटील-यड्रावकर. समोर रॅलीत सहभागी जयसिंगपूरवासीय.

हक्काचा खासदार म्हणून मानेंना
मताधिक्य द्या : अभिनेते गोविंदा
जयसिंगपूर येथे प्रचारार्थ रॅली
जयसिंगपूर, ता. २ : ‘‘तुमच्या आमच्या कामाचा आणि हक्काचा खासदार म्हणून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मताधिक्य द्या, असे आवाहन अभिनेते माजी खासदार गोविंदा यांनी केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मंगळवारी सायंकाळी अभिनेते गोविंदा, शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी जयसिंगपूर शहरातून रॅली काढली. रॅलीत उमेदवार माने, माजी नगराध्यक्ष संजय पाटील (यड्रावकर) सहभागी झाले होते. या वेळी गोविंदा बोलत होते. रॅलीला शहरवासीयांकडून प्रतिसाद मिळाला.
सुरूवातीला अभिनेते गोविंदा यांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. यड्रावकर यांनी गोविंदा यांचा सत्कार केला. त्रिशला संजय पाटील-यड्रावकर यांनी शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांचा सत्कार केला. त्यानंतर रॅलीस सुरुवात झाली. स्टेशन रोडने रॅली चौथ्या गल्लीत आली. ग्रामदैवत श्री सिद्धेश्‍वर मंदिरात अभिनेते गोविंदा यांनी दर्शन घेतले. यानंतर रॅली पहिल्या गल्लीतून स्टेशन रोडने गांधी चौक मार्गे मध्यवर्ती क्रांती चौकात आली. या ठिकाणी अभिनेते गोविंदा यांनी श्रीमंत जयसिंग महाराज व राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर रॅली तेरावी गल्ली, जुनी भाजी मंडई, नगरपालिका रोडने राजीव गांधीनगरमध्ये आली. यानंतर रॅलीची सांगता झाली. रॅलीत ‘शरद’चे संचालक आदित्य पाटील-यड्रावकर, राहुल पाटील, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे, दादासो पाटील-चिंचवाडकर, प्रकाश लठ्ठे, माजी नगरसेवक राहुल बंडगर, महेश कलकुटगी, अभिजित भांदिगरे, प्रवीण इंगळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT