कोल्हापूर

मतदान शपथ

CD

पावणेसात लाख लोकांनी घेतली मतदान करण्याची शपथ
..............
प्रशासनाचा उपक्रम : ऑनलाईन नोंदवली मतदारांनी मते
...............
कोल्हापूर, ता. २ : लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदार जनजागृतीचा उपक्रम म्हणून जिल्ह्यातील मतदारांकडून “मी मतदान करणारच” अशी ऑनलाईन शपथ घेण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यात पावणेसात लाख मतदारांनी मतदान घेण्याची शपथ घेतली.
जिल्हा परिषद स्तरावर सहा लाख ५७ हजार ३४७, तर महानगरपालिका नगरपालिका स्तरावरील प्रत्येकी आठ हजार मतदारांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा "स्वीप"चे नोडल अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला.
केवळ बारा तासांत एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदारांनी प्रतिज्ञा घेण्याची भारतातील ही विक्रमी नोंद ठरण्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित एजन्सीकडे पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे मतदान करण्याकरिता प्रबोधन करणे व त्यांनी शपथ घेण्यासाठी सुनियोजित प्रयत्न करण्यात आले. याबाबत सर्व यंत्रणांच्या बैठका घेण्यात आल्या. सर्व शासकीय व इतर विभागांना सोबत घेऊन १ मे महाराष्ट्र दिना दिवशी जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याची शपथ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेअंतर्गत सर्व पंचायत समितीमार्फत गाव स्तरावर यंत्रणा तयार करून १ मे रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणा म्हणजेच अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, सीआरपी, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांना मतदान करण्याची शपथ घेण्याबाबत प्रबोधन केले. "मी मतदान करणारच" या शपथ उपक्रमाची नोंद करण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली व सूक्ष्म नियोजनातून सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी जिल्हा स्तरावरून कार्यवाही केली. नागरी भागामध्ये सहकारी संस्थेचे उपनिबंधक नीलकंठ करे व कोल्हापूर महानगरपालिकेच्या वरिष्ठ लेखाधिकारी वर्षा परीट-साळुंखे यांनी कार्यवाही पूर्ण केली.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT