कोल्हापूर

धैर्यशील माने

CD

81189
इचलकरंजी : येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ वडार समाजाच्या मेळाव्यात बोलताना विजय चौगुले.

नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकारूया
विजय चौगुले; मुख्यमंत्र्यांमुळे महामंडळाची स्थापना

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २ : महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना निवडून देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करूया आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘४०० पार’चे स्वप्न पूर्ण करूयात, असे आवाहन मी वडार महाराष्ट्राचा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय चौगुले यांनी केले. येथे वडार समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा लक्ष्मण वडार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली. मंत्रिमंडळाची मान्यता मिळून २५ कोटींचा निधीही मिळाला. त्यातून या समाजाच्या युवकांना व्यवसायासाठी अर्थसाहाय्य मिळणार आहे. वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळातून वडार समाजाच्या विद्यार्थ्यांना पदवी व उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडार समाजाला न्याय दिला आहे.’’
यावेळी खासदार धैर्यशील माने म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्य शासन कष्टकऱ्यांकडे अधिक लक्ष देत आहेत. त्यातूनच वडार समाजातील नव्या पिढीला नवा उद्योग व्यवसाय व शिक्षणासाठी पहिल्यांदाच महामंडळ स्थापन करून न्याय देण्याचा प्रयत्न शिंदे यांनी केला आहे. मी, यापुढे वडार समाजाचा नव्या पिढीला सहकार्यासाठी कटिबद्ध आहे.’’
माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या संघटनेला बळ दिले आहे. त्यामुळे खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्याने विजयी करूया.’’ आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, अशोकराव स्वामी, मिश्रीलाल जाजू, अजितमामा जाधव, पै. अमृत भोसले, अर्जुन देशमुख, मारुती पाथरवट आदींनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT