कोल्हापूर

अमित शहा बातमी

CD

81191
कोल्हापूर ः भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे गुरुवारी रात्री येथे आगमन झाले. त्यावेळी त्यांचे स्वागत करताना राहुल चिकोडे आणि महेश जाधव.
अमित शहा
कोल्हापुरात
दाखल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२ ः भाजपचे वरिष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री कोल्हापुरात दाखल झाले. ते, उद्या (ता. ३) सकाळी नऊला प्रमुख नेते, कार्यकर्ते यांच्याबरोबर बैठक घेऊन लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर ते हुक्केरी येथे सभेसाठी जाणार आहेत. तेथून परत कोल्हापुरात येऊन दिल्लीकडे रवाना होतील.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता टिपेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा कोल्हापुरात आले आहेत. ते, लखनौवरून कोल्हापूर विमानतळावर रात्री साडेदहाच्या सुमारास पोहोचले. यावेळी खासदार संजय मंडलिक, धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर अमित शहा यांचा ताफा हॉटेल पंचशीलमध्ये आला. यावेळी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजित घाटगे, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल देसाई, राहुल चिकोडे, महिला आघाडी अध्यक्ष रुपाराणी निकम, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. शहा उद्या सकाळी नऊला दोन्ही लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आढावा घेणार आहेत. त्यानंतर सकाळी ते अकरा वाजता हुक्केरीतील सभेसाठी रवाना होतील. तेथून ते संध्याकाळी गोव्यातील सभेसाठी जातील. त्यानंतर ते, रात्री परत कोल्हापुरात येऊन दिल्लीला रवाना होणार आहेत. दरम्यान, आज अमित शहा येणार म्हणून पोलिसांनी या परिसरातील वाहतूक अन्य मार्गाने वळवली होती. मोठा बंदोबस्तही लावण्यात आला होता.
---------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT