कोल्हापूर

वाय. पी. पोवारनगर चौकात सांडपाणी-

CD

फोटो 82789
वाय. पी. पोवार चौकात सांडपाणी रस्त्यावर
कोल्हापूर, ता. १० ः ड्रेनेज लाईन तुंबून ओसंडल्याने वाय. पी. पोवारनगर चौकात सांडपाणी रस्त्यावर पसरले. वाहनधारक, पादचाऱ्यांना त्यातूनच वाट काढावी लागली. यापूर्वीही अनेकदा या लाईनमधून सांडपाणी रस्त्यावर आले. त्याबाबत ठोस उपाययोजना झालेली नाही.
वाय. पी. पोवार चौकात ड्रेनेज लाईनचे दोन मॅनहोल्स आहेत. हुतात्मा गार्डनकडील मॅनहोलमधून नेहमी सांडपाणी बाहेर पडून रस्त्यावरून वाहत असते. आज त्या चौकातील यादवनगरकडील मॅनहोलमधून सांडपाणी बाहेर पडले. त्याचे प्रमाण इतके होते की चौक तर सांडपाण्याने भरलाच, शिवाय हुतात्मा गार्डनच्या दिशेने रस्त्यावरून वाहून जात होते. हा रस्ता केला जात असल्याने आधीच खडी तसेच मातीचे साम्राज्य आहे. त्यात सांडपाणी मिसळल्याने दलदल झाली. यातूनच वाहनधारकांना ये-जा करावी लागली. पादचारी तसेच त्या परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामनाही करावा लागला.
या चौकात नेहमी ड्रेनेज लाईन तुंबण्याचे प्रकार होत आहेत. पण, त्यावर ठोस उपाययोजना झालेली नाही. या रस्त्याचे काम १०० कोटींच्या निधीतून सुरू आहे. ड्रेनेज लाईनसाठी खोदाई करायची असल्यास रस्ता होण्याआधीच करावी लागणार आहे. अन्यथा बऱ्याच वर्षांपासून खराब असलेला रस्ता नवीन केल्यानंतर पुन्हा खोदला गेल्यास नागरिकांचा संयम राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video Viral : तिलक वर्माने विचारला सूर्या दादाला प्रश्न; उत्तर मिळाले, IPL 2026 मध्ये मी कर्णधार नाही, तू हार्दिकला विचार...

१९ वर्षीय तरुणीला परराज्यात नेत २ लाखांत विकलं, फसवून लग्न केलं अन् २ महिने लैंगिक अत्याचार

Sunil Tatkare Viral Photo Controversy : रुपाली चाकणकरांनंतर आता सुनील तटकरेंही गोत्यात? 'त्या' फोटोने वाढवलं टेन्शन! भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण भोवणार?

अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं, शेवटच्या व्हिडीओत मंत्र्याचं नाव घेतलं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मंत्रि‍पदाचा राजीनामा

Video: 6.6,6,6,6... KKR च्या युवा फलंदाजाने IPL पूर्वीच शतक करत दाखवली ताकद; प्रतिस्पर्ध्यांना रहावे लागेल अलर्ट

SCROLL FOR NEXT