कोल्हापूर

राहुल देशपांडे कलेक्टिव्ह

CD

फोटो- कालच्या बातमीतून
लोगो-82805
...
चला, बहारदार मैफलीचे साक्षीदार होऊया...!
तिकीट बुकिंगला प्रतिसादः १९ मे रोजी चितळे डेअरी प्रस्तुत ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ मैफल
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : प्रसिद्ध गायक - संगीतकार राहुल देशपांडे यांच्या चितळे डेअरी प्रस्तुत ‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या बहारदार संगीत मैफलीसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. सकाळ माध्यम समूहातर्फे या मैफलीचे आयोजन केले असून, १९ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही मैफल रंगणार आहे. काजवे फर्निचर, एस. जी. फायटो फार्मा प्रायव्हेट लिमिटेड असोसिएट स्पॉन्सर आहेत.
दरम्यान, महासैनिक दरबार हॉलच्या लॉनवर रंगणाऱ्या या मैफलीत राहुल देशपांडे हिंदी व मराठी सिनेगीतांसह गझल सादर करणार आहेत. साहजिकच या मैफलीची उत्सुकता शिगेला पोहोचली असून ‘तिकीट खिडकी’ या संकेतस्थळावर तिकीट विक्रीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.
आजोबा वसंतराव देशपांडे यांच्याकडून गायनाचा समृद्ध वारसा लाभलेले राहुल यांनी अल्पावधीतच आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शास्त्रीय संगीतासह नाट्यगीते, सुगम संगीत, चित्रपट गीते, गझल अशा सर्व गायन प्रकारांवर त्यांचे प्रभुत्व आहे. विविध संगीत प्रकारांतील वैविध्यपूर्ण गाणी ते या मैफलीत सादर करतील. त्यांना लाईव्ह संगीतसाथ असेल. अवीट गझलांची अनुभूतीही ते देणार आहेत. चला, तर मग आजच तिकीट बुक करूया. एका बहारदार मैफलीचे साक्षीदार होऊया.
...
मैफलीविषयी...
० कधी : १९ मे
० वेळ : सायंकाळी ६.३० वाजता
० ठिकाण : महासैनिक दरबार हॉल लॉन, सर्किट हाऊस परिसर
० व्हीव्हीआयपी तीन व्यक्तींसाठी सोफा, त्यानंतर प्लॅटिनम, डायमंड आणि गोल्ड चेअर अशी बैठक व्यवस्था
० राहुल देशपांडे तीन वर्षांनंतर कोल्हापुरात. तरुणाईसह ज्येष्ठ आणि सहकुटुंब अनुभवावी अशी मैफल
० ग्रुप बुकिंगला प्राधान्य. व्यापाऱ्यांसह विविध आस्थापनांना कर्मचाऱ्यांसाठी मैफलीची देता येईल अनोखी भेट
...
लोगो- कालच्या बातमीतून
क्यूआर कोड- कालच्या बातमीतून
तिकिटे ऑनलाईन उपलब्ध, सन्मानिका नाहीत...
‘राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ या मैफलीची तिकिटे www.ticketkhidakee.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यासाठी सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा. हा पूर्णपणे तिकीट शो असल्याने कोणत्याही प्रकारच्या विनामूल्य सन्मानिका दिल्या जाणार नाहीत. अधिक माहितीसाठी संपर्क : ९५५२५८१९१८.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy Recruitment : देशभरातील औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना

Mumbai-Goa Highway: भरधाव वेगातील थारचं नियंत्रण सुटलं अन्..., दोन जणांचा जागीच मृत्यू; घटनेत कारचा चक्काचूर

Monsoon Alert: पुण्यात अखेर मॉन्सूनची दमदार एन्ट्री; कोकण-मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, विदर्भात उष्णतेचा ऑरेंज इशारा कायम

'बिग बॉस मराठी' फेम अनुश्री मानेने दिली गुड न्यूज; खरेदी केलं स्वतःचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणते- आज...

‘अ स्टोरी ऑफ टायटन’: यश, अपयश आणि स्वतःला शोधण्याच्या प्रवासाचं मानसशास्त्र

SCROLL FOR NEXT