कोल्हापूर

बाळूमामा पालखीची गडहिंग्लजला नगर प्रदक्षिणा

CD

gad108.jpg
82818
गडहिंग्लज : संत बाळूमामा व हालसिद्धनाथ मंदिर सेवा संस्थानतर्फे शहरातून बाळूमामा पालखीची मिरवणूक निघाली. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------
बाळूमामा पालखीची
गडहिंग्लजला नगर प्रदक्षिणा
धनगरी ढोल वादन लक्षवेधी : डोणे महाराजांची भाकणूक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील संत बाळूमामा व हालसिद्धनाथ मंदिर सेवा संस्थानतर्फे सुरू असलेल्या भंडारा महोत्सवाची सांगता झाली. यानिमित्त बाळूमामा पालखीचा नगरप्रदक्षिणा सोहळा उत्साहात झाला. दरम्यान, भगवान डोणे महाराजांनी रात्री भाकणूक केली. आज (ता. १०) सकाळी आयोजित महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला.
येथील संत श्री बाळूमामा मंदिरात तेरा दिवसापासून भंडारा महोत्सव सुरू आहे. उत्सवाची सांगता पालखी नगर प्रदक्षिणेने झाली. सायंकाळी पाच वाजता मंदिरापासून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे, नुलचे श्री भगवानगिरी महाराज, नायब तहसीलदार विष्णू बुट्टे, मंडळ अधिकारी राजू पाटील, तलाठी अजय किल्लेदार यांच्याहस्ते पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्टँड, तेलवेकर गल्ली, कुंभार वसाहत, मठ गल्ली, शिवाजी चौक, वीरशैव चौक, मुसळे कॉर्नर, दसरा चौक, चर्च रोड, गांधीनगर पासून मंदिरात या पालखी नगर प्रदक्षिणेची सांगता झाली.
मिरवणुकीत ५१ धनगरी ढोलचा निनाद लक्षवेधी ठरला. बेंजोच्या निनादात निघालेल्या या मिरवणुकीचे महिलांनी ठिकठिकाणी पाणी घालून स्वागत केले. दरम्यान, रात्री मंदिराजवळ वाघापुरच्या भगवान डोणे महाराजांची भाकणुकीचा कार्यक्रम झाला. मंदिर देवस्थान सेवा संस्थानचे अध्यक्ष रमेश रिंगणे, उपाध्यक्ष विठ्ठल भम्मानगोळ, राजशेखर यरटे, सोमगोंडा आरबोळे, बाळूमामा काडापुरे, सचिव चंद्रकांत सावंत, अमरनाथ घुगरी, जवाहर घुगरी, सहदेव काडापुरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT