कोल्हापूर

राजेखान जमादारवर गुन्हा दाखल

CD

शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख
राजेखान जमादारवर गुन्हा दाखल
‘सकाळ’च्या बातमीदाराला मारहाण ः उचलून नेण्याची धमकी देत मारहाण करणाऱ्या दोघांवरही गुन्हा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० ः मुरगूड (ता. कागल) येथील दैनिक ‘सकाळ’चे बातमीदार प्रकाश तिराळे यांना मारहाण केल्याबद्दल माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख राजेखान कादरखान जमादार याच्यावर गुन्हा दाखल झाला. तसेच उचलून नेण्याची धमकी देत मारहाण करणाऱ्या आसिफखान ऊर्फ मॉन्टी आसदखान जमादार व संदीप अशोक सणगर (सर्व रा. मुरगूड) यांच्यावरही गुन्हा नोंद झाल्याची माहिती करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांनी दिली. याची नोंद मुरगूड पोलिस ठाण्यात झाली.
उपअधीक्षक क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सकाळ’चे बातमीदार प्रकाश तिराळे यांना बातमी दिल्याच्या गैरसमजातून मुरगूड येथील मेंडके यांच्या बेकरीच्या समोर काल (ता.९) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही मारहाण झाली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘तिराळे हे कार्यालयीन कामानिमित्त जाताना जमादार हा समोरून आला. यावेळी जमादार याने तिराळे यांना बातमी प्रसिध्द करण्यावरून जाब विचारत मारहाण केली. काही वेळातच आसिफखान जमादार व संदीप सणगर हे दोघे तेथे आले आणि त्यांनीही तिराळे यांना शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी तेथे जमलेल्या नागरिकांनी तिराळे यांची सुटका केली. तिराळे यांनी तिघांकडून मी व माझ्या कुटुंबियांच्या जीवितास धोका असल्यामुळे पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दाखल केली.’
दरम्यान, गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिस ठाण्याच्या बाहेर जमाव करून दडपशाही करण्याचाही प्रयत्न झाला. अखेर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांचे मार्गदर्शन घेऊन रात्री दीडच्या सुमारास गुन्हा दाखल झाला. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, पत्रकारांनी तिराळे यांच्याबाजूने उभे राहून त्यांना पाठिंबा दिला.
...
तीन वर्षे शिक्षेची तरतूद
‘पोलिसांनी महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसारमाध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम २०१७ च्या कलम चारनुसार गुन्हा दाखल केला. या कलमानुसार तीन वर्षांची शिक्षा आणि पन्नास हजार रुपयांचा दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. याचा तपास उपअधीक्षकांकडून होतो’, अशी माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे यांनी दिली. याचवेळी भारतीय दंड संहिता १८६० कलम ३२३, ५०४, ५०६, ४२७ आणि ३४ नुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याही माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smit Machar: ''तो' माझ्यावर वार करत होता, तरीही...'' कॅप्टन स्मित मछार यांनी सांगितला थरार; विमानावरील हल्ल्यानंतरचा व्हिडिओ समोर

Health Center in Darkness: नेत्यांसह प्रशासन झोपलंय का? लिहाखेडीत आरोग्य उपकेंद्रच अंधारात; प्रशासनाला जाग कधी? दोन वर्षांपासून वीजपुरवठा बंद

Latest Marathi News Live Update: पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेन्शन जमा

Navi Mumbai: नवी मुंबईकरांवर पाणीटंचाईचे संकट, मोरबेत ७३ टक्के पिण्यायोग्य साठा

हो, त्या सासू म्हणून खूप कडक... सून पूजा बिरारीचं सुचित्रा बांदेकरांबद्दल वक्तव्य;म्हणते, 'मी सगळ्यांना हेच सांगते की...

SCROLL FOR NEXT