कोल्हापूर

सांस्कृतिक कोल्हापूर

CD

लोगो- सांस्कृतिक कोल्हापूर
--------------
82898
‘मधुबाला’ लघुपटातील एक प्रसंग.

‘मधुबाला’ लघुपटाची
विविध महोत्सवांसाठी निवड
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : निलअश्‍व स्टुडिओनिर्मित व स्वप्नील पाटील दिग्दर्शित ‘मधुबाला’ या लघुपटाची विविध चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली आहे. लघुपटाचा प्रोमो शनिवारी सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला.
जागतिक समाजव्यवस्थेत वेगवेगळ्या स्तरावर काम करणाऱ्या महिला आहेत. याच वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या मधू या स्त्रीचे भावविश्‍व मांडणारा, तसेच अवधूत या कवी मनांच्या लेखकाचे भवताल दाखवणारा हा लघुपट आहे. लघुपटाची निर्मिती येथील निलअश्‍व स्टुडिओ या प्रॉडक्शन कंपनीने केली आहे. अभिनेत्री अपर्णा चोथे, अभिनेते विकास पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ऋषिकांत राऊत यांचे लेखन शंतनू खांडगे यांचे छायांकन आहे. चंद्रशेखर गुरव यांचे संकलन, शशांक पोवार यांचे संगीत, महेश जाधव यांची रंगभूषा, शाहिस्ता मकानदार यांची वेशभूषा आहे. अभिनव कुरणे यांनी सहायक दिग्दर्शक म्हणून, तर सलिम फरास यांनी साऊंड डिझायनर म्हणून काम पाहिले आहे. लघुपटाला इंडियन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल ॲवॉर्ड मिळाले आहे. डॉ. बी. आर. आंबेडकर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, केरळ शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल, चित्रपती व्ही. शांताराम शॉर्टफिल्म फेस्टिव्हल, पुणे शॉर्टफिल्म फेस्टिव्हल आदी महोत्सवासाठी लघुपटाची निवड झाली आहे.
---------------
खेबूडकरांची गाणी
आज ९१ गायक गाणार
कोल्हापूर, ता. ११ : प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबूडकर यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त उद्या (ता.१२) ९१ गायक कराओके ट्रॅकवर खेबूडकर यांची गाणी गाणार आहेत. सरगम गायन ग्रुपतर्फे खेबूडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी ही मैफल होणार आहे. येथील राजारामपुरीतील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
--------------
आपापल्या परिसरात
आता होणार निसर्गचित्रण!
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : प्रत्यक्ष निसर्गचित्रणाची परंपरा आता पुन्हा युवा चित्रकारांनी सुरू केली आहे. प्रत्येक शनिवारी ही मंडळी शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष निसर्गचित्रण करू लागली आहेत. गेली सहा महिने हा उपक्रम सुरू असून, आता वाढत्या उन्हामुळे पुढील तीन शनिवारी ही मंडळी आपापल्या परिसरातच निसर्गचित्रण करून उपक्रम अखंड ठेवणार आहेत.
शहरातील चित्रकार मंडळी पूर्वी एकत्रित येऊन रेखाटने, प्रत्यक्ष निसर्गचित्रण करायचे आणि सर्वांच्या कलाकृतींवर चर्चाही व्हायची. रेखाटनाची चळवळ अजूनही सुरू आहे. पण, प्रत्यक्ष निसर्गचित्रणाचा उपक्रम काही वर्षे बंद होता. तो आता पुन्हा सुरू झाला आहे. प्रत्येक शनिवारी सकाळी एखाद्या ठिकाणी ही मंडळी एकवटतात. निसर्गचित्रणाची स्थळे निश्‍चित करतात. त्यानंतर रेखाटन करूनच निसर्गचित्रण पूर्ण करतात. मात्र, वाढत्या उन्हामुळे आता पुढील तीन दिवस आपापल्या परिसरात एखाद्या ठिकाणी परिसरातील विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन ही मंडळी निसर्गचित्रण करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा ! शेतकऱ्याची जमीन हडपली, पोलिसांकडे तक्रार करताच सुपारी देऊन हत्या

Gopikishan Bajoria: पक्षाच्या वाढीसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे: माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया; चार नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश!

Numerology : 'या' 3 मूलांकाच्या मुली असतात सर्वांत जास्त साध्याभोळ्या; साक्षात लक्ष्मीचे रूप बनून बदलतात जोडीदाराचे आयुष्य

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अशोक खरातचा पीए रमेश हिंगे फरार, SIT कडून शोधमोहीम सुरू

Pune Magarpatta Canal Burst : मगरपट्टा परिसरात कालवा फुटला; 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा, घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' पर्यायी मार्ग नक्की पाहून घ्या...

SCROLL FOR NEXT