कोल्हापूर

शिवजयंती मिरवणूक

CD

83056
बेळगाव : येथे शिवजयंती मिरवणुकीत तरुणाईने उत्साहात सहभाग दाखवत शिवकाळ जागवला.
....

बेळगावात साकारला शिवकाळ

शिवजयंती मिरवणूक ः जिवंत देखाव्यामधून इतिहास सादर

सकाळ वृत्तसेवा
बेळगाव, ता. ११ : छत्रपती शिवाजी महाराजांचा अखंड जयघोष करत बेळगावात जिवंत देखाव्यांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सादर करण्यात आला. पावसाची छाया असताना देखील शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीने शिवकाळ जागवत शिवप्रेमींच्या डोळ्याचे पारणे फेडले. रात्री उशिरा मिरवणूक सुरू झाली, तरी पहाटेपर्यंत उत्साह कायम होता.
बेळगाव शहर आणि परिसरातील ऐतिहासिक शिवजयंती उत्सव मिरवणुकीला पावसामुळे विलंब झाला. तसेच रात्री दहानंतर चित्ररथ देखावा सादर करण्यास सुरुवात झाली. यावेळी सह्याद्रीपुत्र युवक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजा यांच्यावर करण्यात आलेला विषप्रयोग, एकदंत युवक मंडळ समर्थनगर यांनी कोंडाजी फर्जंद, अनंतशयन गल्ली येथील भगवे वादळ युवक मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव, ताशिलदार गल्लीतील मंडळाने प्रतापराव गुर्जर यांचा पराक्रम, पाटील गल्ली येथील भगतसिंग चौक मंडळाने अफजल खान वध हा देखावा सादर केला. यासह बेळगाव शहरातील अनेक मंडळानी जिवंत देखावे सादर केले. त्यामुळे शहरासह विविध भागातून आलेल्या शिवप्रेमींना महाराजांचा इतिहास जवळून अनुभवता आला. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील रात्री उशिरापर्यंत मंडळांना सूचना करताना दिसून येत होते. त्यामुळे मिरवणूक शांततेत पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway News: भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय! रेल्वे ट्रॅकखाली १२ तासांत सबवे उभारणार; ग्रामीण भागासाठी ‘गेमचेंजर’ योजना

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

SCROLL FOR NEXT