कोल्हापूर

मुहूर्तावर शहरात सव्वाचार हजार वाहनांची खरेदी

CD

अक्षय मुहूर्तावर सव्वाचार हजार वाहनांची खरेदी
दुचाकीच्या विक्रीत वाढ; चारचाकीसाठी मात्र अजूनही प्रतीक्षाच

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर अनेकांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह वाहन खरेदीला सर्वाधिक पसंती दिली. त्यामुळे शहरात नव्याने चार हजार ३५७ वाहनांची गेल्या आठवडाभरात कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंद झाली. यात सर्वाधिक तीन हजार दुचाकींचा समावेश आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीत घट झाली आहे, तर दुचाकीच्या खरेदीत वाढ झाली आहे.
वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया मुहूर्तावर अनेकांनी सोने, चांदीचे दागिने, घर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसह वाहन खरेदीला पसंती दिली. विशेष म्हणजे अनेकांनी वाहन खरेदीवर भर दिला. १ ते १० मे दरम्यान प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे ४ हजार ३५७ वाहनांची नोंद झाली आहे. यात ३ हजार १२ दुचाकी, तर ७०२ चारचाकींचा समावेश आहे यानंतर मालवाहतूक तीन चाकी रिक्षा, ट्रक, टेम्पो आदी वाहनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही चारचाकींना अजूनही दोन-दोन महिन्यांची प्रतीक्षा आहे. त्यासाठी आगावू आरक्षण करणाऱ्या ग्राहकांना मुहूर्तावर आपली वाहने घरी नेता आली. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुचाकी खरेदीचा वेग कायम राहिला आहे, तर चारचाकी खरेदीत काही प्रमाणात घट झाली आहे.

चौकट
‘ईव्ही’लाही मागणी
पेट्रोल दुचाकीच्या तुलनेत इलेक्ट्रॉनिक्स दुचाकीच्या किमती चढत आहेत. त्यात शासनाने अनुदान बंद केल्यामुळे अनेकांना ईव्ही दुचाकी घेण्याची इच्छा असली, तरी बजेटच्या विचारांमुळे अनेकजण पुन्हा पेट्रोल दुचाकीवर समाधान मानत आहेत. तरीही अक्षय तृतीया आणि गेल्या दहा दिवसांत दुचाकीसह चारचाकी अशा ४०५ वाहनांची नोंद झाली आहे. चार्जिंग स्टेशनची कमतरता असल्याने ईव्ही दुचाकी खरेदीवर काहीअंशी मर्यादा येत आहे. ही स्टेशन्सची संख्या शहरात वाढविल्यास मागणीत पुन्हा वाढ होऊ शकेल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
......
कोट
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर दुचाकीसह चारचाकी वाहनांना मागणी होती. त्यात इलेक्ट्रॉनिक्स दुचाकीलाही प्रतिसाद मिळत आहे. येत्या काळात ही मागणी आणखी वाढेल, असे चित्र आहे.
- करण सोनावणे, वाहन वितरक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: ''होर्मुजची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ४८ तासांचा अल्टिमेटम, नाहीतर भीषण परिणाम...'' थेट इशारा

Solapur Awareness Ride: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी जन्मभूमी ते कर्मभूमी सायकल यात्रा; जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

विहीर रस्त्याच्या मधोमध, कठडा मोठा असता तर दुर्घटना टळली असती; CM फडणवीसांनी दुर्घटनेवर व्यक्त केलं दु:ख

विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी! आता मुलींना दरमहा ५०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार, पण कोणाला? जाणून घ्या...

Pune Overhead Cable Action: अनधिकृत ओव्हरहेड केबलवर महापालिकेची धडक कारवाई कायम; इंटरनेट बंद पडल्याने ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरदारांची तारांबळ

SCROLL FOR NEXT