कोल्हापूर

गड- कागदपत्र देण्यास टाळाटाळ

CD

कागदपत्र देण्यास हिटणी
दूध संस्थेकडून टाळाटाळ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ ः हिटणी (ता. गडहिंग्लज) येथील श्री बसवेश्वर सहकारी दूध संस्थेच्या व्यवस्थापनाकडून कोर्ट कामासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार निंगाप्पा नंदगावी यांनी विभागीय उपनिबंधकांकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, २०२०-२१ मध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर संचालक मंडळाची बैठक घेऊन त्यात निंगाप्पा नंदगावी यांची बनावट सही करून दूध उत्पादक नसणाऱ्या ३८ जणांना नवीन सभासदत्व दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नंदगावी उच्च न्यायालयात दावा दाखल करणार आहेत. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची मागणी संस्थेकडे केली. परंतु उडवा-उडवीची उत्तरे देत संस्थेने कागदपत्रे दिलेली नाहीत. काही कागदपत्रे दिली असली तरी नवीन सभासद केलेल्या बैठकीचे इतिवृत्त मात्र देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे. याबाबत कोल्हापूर सहायक निबंधकांकडे मागणी केल्यानंतर त्यांनी संस्थेला कागदपत्रे देण्याचे निर्देश दिले. तरीसुद्धा कागदपत्रे दिली नसून सहायक निबंधकांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. यामुळे संस्थेवर कायदेशीर कारवाई करून कागदपत्रे देण्यासंदर्भात आदेश व्हावेत, अशी मागणी केली आहे; अन्यथा उपोषणाचा इशारा दिला आहे.
...
सर्व कागदपत्रे सादर ः सचिव
सचिव शिवाजी व्हंजी म्हणाले, ‘नवे सभासद कायदेशीरच केले आहेत. त्यावर नंदगावी यांनी सहायक निबंधकांकडे घेतलेल्या हरकतीमध्ये संस्थेच्या बाजूने निकाल लागला आहे. नंदगावी यांनी मागणी केलेली सर्व कागदपत्रे सहायक निबंधकांकडे यापूर्वीच सादर केली असून नव्याने केलेल्या सभासदांचे इतिवृत्तही दोन दिवसांपूर्वीच जमा केले आहे. यामुळे संस्थेकडून कागदपत्रे मिळालेली नाहीत आणि बनावट सहीचा आरोपही चुकीचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT