कोल्हापूर

गड- ग्रामदैवतावर वीज

CD

खमलेहट्टीत मंदिरावर कडाडली वीज

इलेक्ट्रिक संच जळाल्याने नुकसान
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ ः खमलेहट्टी (ता. गडहिंग्लज) येथील ग्रामदैवत श्री महादेवाच्या मंदिरावर काल (ता. ११) सायंकाळी वीज कडाडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मंदिरातील संपूर्ण इलेक्ट्रिक संच जळाल्याने मंदिर अंधारात आहे. ‘महावितरण’ व महसूल खात्याकडून भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तालुक्याच्या पूर्वेला असणारे खमलेहट्टी छोटेसे गाव. जरळी, मुगळी, खमलेहट्टी व परिसराला काल सायंकाळी वळिवाच्या पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटात तब्बल दोन तास पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. वादळी वारे आणि विजांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण होते. दरम्यान, खमलेहट्टीचे ग्रामदैवत महादेव मंदिराच्या शिखरावर वीज कडाडली. शिखराच्या बांधकामाला या विजेने कोणताही धोका पोहोचला नसला तरी तेथून येणारी वीजजोडणीची केबल मात्र खाक झाली आहे. तसेच वीज मीटर, मेन स्वीच, फ्यूज, मंदिरातील संपूर्ण वायरिंग जळून लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, लोकवर्गणीतून झालेल्या मंदिरातील विजेचा संच संपूर्ण जळाल्याने मंदिर अंधारात आहे. तेव्हा तातडीने आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून महावितरण व महसूल विभागाने या नुकसान भरपाई देण्याची गरज नागरिकांतून व्यक्त होत आहे. तलाठी व ग्रामपंचायतीने या नुकसानीची पाहणी करून भरपाईची लेखी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जिम बंद केलं, आठवड्यात साहित्य विकायचं होतं, दगडूशेठ मदतीला धावला... 'कृष्णाईच्या लेकी' अभिनेत्याने सांगितला अनुभव

Gangapur Maize Crop Crisis : करपलेली मका मुरघाससाठी विकण्याची वेळ ; उत्पादन खर्चही निघणे कठीण; पश्चिम महाराष्ट्र-कर्नाटकातून चाऱ्यासाठी मागणी

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुंबई-पुण्यात गणेश विसर्जनाची लगबग; वाहतुकीपासून मिरवणुकीपर्यंत प्रत्येक अपडेट LIVE

Kolhapur Mumbai Special Train : दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून कोल्हापूर ते मुंबई, कलबुर्गीसाठी विशेष गाड्या जाहीर; पाहा रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक

Gyanesh Kumar Petition : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ; थेट कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल, 'ते' 14 निर्णय वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT