कोल्हापूर

दारूच्या नशेत मित्राचा गळा आवळून खून

CD

83182 मयत दिनेश सोळांकूरकर

83183 संशयित आरोपी ः सन्मेश तेंडुलकर
...
दारूच्या नशेत मित्राचा गळा आवळून खून
राजारामपुरीतील घटना ः फ्लॅटवर राहण्यास आला असता प्रकार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः मद्यधुंद अवस्थेत शिवीगाळ केल्याच्या रागातून दिनेश अशोक सोळांकूरकर (वय ३४, रा. रेखानगर, गारगोटी) याचा मित्रानेच गळा घोटल्याचा प्रकार उघडकीस आला. राजारामपुरी सातव्या गल्लीतील कोटणीस हाईट्स इमारतीत रविवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी सन्मेश अशोक तेंडुलकर (५४) याला अटक करण्यात आली आहे.
सन्मेश तेंडुलकर हा राजारामपुरीतील फ्लॅटमध्ये एकटाच राहतो. त्याने फायनान्स कंपनीतून निवृत्ती घेतली आहे. त्याची पत्नी विभक्त राहत असून तो दारूच्या आहारी गेला होता. त्याचा दूरचा नातेवाईक व मित्र दिनेश सोळांकूरकर हा दोन दिवसांपासून त्याच्याकडे राहण्यास आला होता. दोघांनी रात्री एकत्रच मद्यपान केले होते.
...
प्रेमप्रकरणात मध्यस्थी करण्याची गळ....
दिनेश याने काही महिन्यांपूर्वी एक फायनान्स कंपनी काढली होती; पण यामध्ये त्याला मोठा तोटा सहन करावा लागल्याने त्याने हा व्यवसाय बंद केला होता. नातेवाईक असलेल्या तेंडुलकरकडे यानिमित्ताने सल्ला घेण्यासाठी त्याचे येणे-जाणे होते. त्याच्या एका प्रेमप्रकरणात सन्मेशने मदत करावी, यासाठी तो वारंवार त्याला गळ घालत होता.
...
फ्लॅटवर वादावादी...
दिनेश दोन दिवसांपासून राजारामपुरीतील सन्मेशच्या फ्लॅटवर मुक्कामास होता. शनिवारी रात्री दोघांनीही एकत्र मद्यपान केले. पहाटेच्या सुमारास त्यांच्यात वाद झाला. दिनेशने शिवीगाळ व मारहाण केल्याच्या रागातून संशयित तेंडुलकरने दिनेशचा पाठीमागून जोरात गळा आवळला. यातच तो गतप्राण झाला.
...
पोलिसांना फोनवरून दिली माहिती
संशयित सन्मेश दोन-तीन तास मृतदेहाजवळ बसून होता. अखेर त्यानेच पोलिस हेल्पलाईनवर आपण मित्राचा गळा आवळल्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक विकास आडसूळ, समीर शेख, अरविंद पाटील, रंगराव चव्हाण, हरीश सूर्यवंशी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सन्मेशला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. पोलिस चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली.
दिनेशच्या मागे आई, बहीण, मेव्हणा असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: दुष्काळाने ऊसही कडू केला; दिवाळी तोंडावर असताना महिला शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, जनावरांच्या चाऱ्यासाठी उभा ऊस विकण्याची वेळ

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT