कोल्हापूर

पंचगंगा नदीत उडी घेतलेल्याचा शोध सूरू

CD

बेपत्ता व्यक्तीचा
पंचगंगा पात्रात शोध
कोल्हापूर ः शास्त्रीनगरातून सहा मे रोजी बेपत्ता झालेल्या तरुणाचे कपडे शनिवारी पंचगंगा नदीकाठीवर मिळून आले. त्याने नदीत उडी मारली असावी का? अशी शंका आल्याने पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने रविवारी दिवसभर नदीपात्रात शोधमोहीम राबविली. मात्र, हाती काही लागले नाही.
शास्त्रीनगर येथील ४३ वर्षीय तरुण सहा मे रोजी सायंकाळी घरातून निघून गेला. त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. अशातच पंचगंगा नदी काठावर त्याचे कपडे नातेवाईकांना मिळून आल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर रविवारी सकाळी ११ वाजता बोटीसह नदीपात्रात शोधमोहीम राबविण्यात आली. ही शोधमोहीम दुपारनंतर थांबविण्यात आली. बेपत्ताची नोंद राजारामपुरी पोलिसांत झाली असून बेपत्ता तरूरुणाचा शोध सुरू आहे.
...
गळफास घेऊन
वृद्धाची आत्महत्या
कोल्हापूर ः जुनी मोरे कॉलनी येथील खाशाबा महादेव सुतार (वय ७५) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली.
...
बांधकामावरून पडून
कामगाराचा मृत्यू
कोल्हापूर ः साळोखेनगरातील एका शैक्षणिक संस्थेच्या बांधकामावरून पडून जखमी झालेल्या परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. कन्हैयालाल जगमोहन (वय ३२, रा. बलरामपूर, उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव आहे. बांधकामावरून पडल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. याची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक; काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारांची नावं निश्चित? राजकीय पक्षांच्या गोटात नेमकं काय चाललंय?

Viral Video : भाई, कॅप्टनला थोडातरी आदर दे! क्विंटन डी कॉक live Match मध्ये टेम्बा बवुमावर चिडला, सहकारी यष्टिरक्षकाला आवरताना दिसले

Ladki Bahin Yojana August Installment : लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली! आजपासून बँक खात्यात जमा होणार 'ऑगस्ट'चे 1500 रुपये; लगेच चेक करा खाते

Mumbai Local: विरार लोकलमध्ये काका तर्राट! दरवाजात उभं राहून बिअर प्यायले अन्...; Video Viral

Latest Marathi News Live Update : १८ वर्षांखालील व्यक्तींसाठी सोशल मीडिया खात्यांवर निर्बंध असावेत: सर्वोच्च न्यायालय

SCROLL FOR NEXT