कोल्हापूर

कष्टाशिवाय यश मिळत नाही ः आनंद काळे

CD

83255

परिश्रमाशिवाय यश नाही
अभिनेते आनंद काळे; ‘संवाद नव्या अनुभवांशी’ उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. १२ ः कोणत्याही क्षेत्रामध्ये कष्ट घेतल्याशिवाय यश मिळत नाही. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्यासाठी लागणारे कौशल्य आपल्यात विकसित करता आले पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आनंद काळे यांनी केले. भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या ‘संवाद नव्या अनुभवांशी’ या उपक्रमात ते बोलत होते. ‘प्रवास, पडद्यावरचा आणि पडद्यामागचा’ या विषयावर त्यांनी सर्वांशी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहुल चिकोडे होते. योगेश चिकोडे यांनी काळे यांचा परिचय करून दिला.
आनंद काळे म्हणाले, ‘‘‘चार दिवस सासूचे’ मालिकेतील अशोक देशमुख या पात्राने त्यांना ओळख करून दिली. ज्यात त्यांनी ८ वर्षं जवळपास ३ हजार ६०० एपिसोड केले होते. एखादे पात्र साकारताना अभिनेत्याला १३ ते १४ तास करावे लागणारी कष्ट आणि वेगवेगळी पात्रे साकारताना करावी लागणारी कसरत आणि गमती त्यांनी सांगितल्या. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील कोंडाजीबाबा फर्जंद हा रोल योगायोगाने मिळाला; पण कोल्हापुरी भाषेमुळे त्यांना फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. त्यांची अजूनही काही ठिकाणी ओळख कोंडाजी बाबा हीच आहे. फक्त अभिनय क्षेत्रातच नाही तर हॉटेल व्यावसायिक म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरमध्ये स्वतःचे हॉटेल असावे ही वडिलांची इच्छा होती. यामुळेच राजपुरुष आणि कार्निवल या दोन हॉटेल्सची सुरुवात केली. याशिवाय ‘महालक्ष्मी सिने सर्व्हिसेस’ नावाने त्यांचे प्रॉडक्शन हाऊसही आहे. सिने क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरुणांनाही त्यांनी करिअरसंदर्भात माहिती दिली वाचन सर्व क्षेत्रात खूप महत्वाचे आहेच. एखादी स्क्रिप्ट नीट सादर करताना वाचन हे खूप प्रभावी ठरते. पुस्तकांबरोबर आपल्याला माणूससुद्धा वाचता आला पाहिजे’
या कार्यक्रमाला हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, दिग्दर्शक सचिन कारंडे, विनोद कांबोज, चंद्रकांत चव्हाण, ध्रुव क्लासचे शहाजी पाटील, चिंतामणी केळकर, शिरीष गर्गे आदींसह नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : विसर्जन रथामुळे रुग्णवाहिकेला रुग्ण उतरवावा लागला भर चौकात; स्ट्रेचरवरून रुग्णाला नेले ढकलत, शास्त्री रस्त्यावरील घटना

ज्ञानेश कुमार यांच्या IAS मुलीला सुप्रीम कोर्टाने दिलासा देताच वकिलांची असोसिएशन आक्रमक, थेट सरन्यायाधीशांना खुलं पत्र

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून हायटेक सुरक्षा कवच; ‘एआय’ कॅमेरे, ड्रोन आणि अद्ययावत वॉर रूम सज्ज

Vani News : बंदोबस्ताच्या कर्तव्यातही ‘बाप्पां’चा आनंद; पोलिसांनी आजच केले गणरायाचे विसर्जन

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

SCROLL FOR NEXT