कोल्हापूर

शेतकरी संघात अपहार नाट्य

CD

मुख्य व्यवस्थापकाला दिले २० लाख
शेतकरी संघाच्या कार्वे शाखा अपहारातील दोषीचा आरोप : संचालक मंडळ बैठकीत खळबळ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ : शेतकरी सहकारी संघाच्या कार्वे (ता. चंदगड) शाखेत झालेल्या अपहाराची जबाबदारी एकट्यावरच निश्‍चित केली. पण, प्रत्येक महिन्याला मुख्य व्यवस्थापकाला १५ हजार रुपये देत होतो. त्याच मुख्य व्यवस्थापकाला एकूण २० लाख रुपये दिल्याचा आरोप अपहारप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या कार्वे शाखेचे माजी व्यवस्थापक शंकर इंगवले यांनी केला. शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील मुख्य कार्यालयात संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या बैठकीतच हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.
शेतकरी संघाच्या संचालक मंडळाची बैठक नुकतीच झाली. या बैठकीला शेतकरी संघाच्या उत्पादन, नफा-तोटा याबद्दल चर्चा झाली. दरम्यान, याच बैठकीत कार्वे शाखेतील ७२ लाखांच्या अपहाराबाबत गुन्हा दाखल झालेले शाखेचे व्यवस्थापक इंगवले आले. त्यांनी यापूर्वी झालेल्या अपहारामध्ये जे-जे जबाबदार अधिकारी आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली. कार्वे शाखेतील अपहारामध्येही अनेकजण सामील आहेत. त्यांच्यावर मात्र कारवाई झाली नाही. कार्वे शाखेतील अपहाराला आपण एकटे जबाबदार नाही, तर संबंधित सर्व अधिकारी जबाबदार आहेत. यापैकी मुख्य व्यवस्थापकांना महिन्याला पंधरा हजार देत होतो. आतापर्यंत त्यांना वीस लाख रुपये दिले असल्याचा आरोप केला. यामुळे बैठकीला उपस्थित सर्वच संचालक अवाक झाले. कोणाला काय बोलावे हे समजेना. ज्या व्यवस्थापकांवर आरोप केला, ते व्यवस्थापकही यावेळी उपस्थित होते. दरम्यान, इंगवले जे काही बोलतात त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही, असे म्हणून संबंधित व्यवस्थापकांनी थोडक्यात उत्तर दिले.
...

‘कार्वे शाखेत झालेला अपहार हा आम्ही संचालक म्हणून येण्याआधी झाला आहे. चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई केली आहे. दरम्यान, संचालक मंडळाच्या बैठकीत इंगवले यांनी व्यवस्थापक, लिपिकांसह अन्य लोकांवर आरोप केला आहे. मात्र, इंगवले यांनी त्यांची ही बाजू चौकशीच्यावेळी सांगितली पाहिजे होती. तसेच त्यांना आता काही बोलायचे असेल तर न्यायालयात सांगितले पाहिजे. न्यायालय ज्या काही सूचना देईल, त्यानुसार कारवाई केली जाईल.
प्रवीणसिंह पाटील, अध्यक्ष, शेतकरी सहकारी संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Returns : तब्बल 400 दिवसांनंतर 'माधुरी' परतली! मध्यरात्री 12.40 वाजता 1160 किमीचा प्रवास करून पोहोचली नांदणीत; उपस्थितांना आनंदाश्रू अनावर

Pimpri News : नोकरीपेक्षा आपला व्यवसायच बरा! दोन लाख ४९ हजार जण उद्योग-व्यवसायाकडे वळले

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

SCROLL FOR NEXT