कोल्हापूर

डेंगी सावधगिरी

CD

शहरात आढळले डेंगीचे पाच रुग्ण
आरोग्य विभाग सतर्क; पुढील आठवड्यानंतर पाहणीचे नियोजन

कोल्हापूर, ता. १३ ः महिनाभरात तपासणी झालेल्या नमुन्यांमधून शहरात पाच डेंगीचे रुग्ण आढळले. खासगी प्रयोगशाळेत तपासणीनंतर आढळणाऱ्या डेंगीसदृश रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून, पुढील आठवड्यानंतर पाहणीचे नियोजन केले जात आहे.
वळीव पावसांना सुरुवात झाली आहे. त्याचे पाणी टायर तसेच घराजवळील इतर साहित्यात साचत आहे. त्या पाण्यात डासांच्या अळ्या तयार होऊन डास तयार होतात. यामुळे डेंगीचे रुग्ण सापडण्याची शक्यता जास्त असते. पावसाळ्यात महापालिकेच्या वतीने तीनशेवर नमुने तपासणीला सीपीआरच्या प्रयोगशाळेत पाठवले जातात. सध्या शंभरावर नमुने पाठवले जात आहेत. गेल्या महिन्यापासून पाठवलेल्या नमुन्यातून वेगवेगळ्या भागातील पाच डेंगीचे रुग्ण आढळले आहेत. यानुसार आठवड्याला एक रुग्ण सापडत आहे. ही संख्या जास्त नसल्याचे महापालिकेच्या सूत्रांचे मत आहे. मात्र, खासगी प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर डेंगीसदृ‍श रुग्णांची संख्या जास्त असल्याचे समजते. त्यामुळे ताप, कणकण आलेले नागरिकही डेंगी असल्याचे समजून तपासणी करून घेत आहेत.
वळीव तसेच मॉन्सून सुरू झाल्यानंतर साचणाऱ्या पाण्यातून डास तयार होत असल्याने मे अखेरीला महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पाहणीस सुरुवात केली जाते. पाणी साचणारी भांडी रिकामी करायला लावली जातात. त्यासाठी आरोग्य विभाग आताच सतर्क झाला आहे. या आठवड्यात बैठक घेण्यात येत असून, त्यानंतर पाहणींचे नियोजन केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar Resigns: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा! राजीनाम्याचं कारणही सांगितलं

धर्मांतर कायद्यानंतर आता UCC! महाराष्ट्रात समान नागरी संहिता लागू करणार? विवाह, वारसा, घटस्फोट नियमांमध्ये होणार बदल

Ashok Kharat: ''अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर घडलेला प्रकार गंभीर...'', आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमरावतीत स्वच्छतेचा बोजवारा; कंत्राटदार नियुक्तीच्या प्रक्रियेला खीळ; सत्ताधाऱ्यांसह विरोधकांच्या तलवारी म्यान

Latest Marathi News Update: राज्यासह देशात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT