कोल्हापूर

चंद्रकुमार नलगे शतकमहोत्सव सोहळा

CD

21554
...
प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या
शंभराव्या पुस्तकाचे २६ मेला प्रकाशन
साहित्यनिर्मितीचा शतकोत्सव सोहळा साजरा होणार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १३ ः महाराष्ट्र शासनाच्या साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांच्या शंभराव्या पुस्तकाचे प्रकाशन २६ रोजी होणार आहे. यानिमित्ताने प्रा. डॉ. नलगे यांच्या ग्रंथलेखनाचा शतकपूर्ती सोहळा साजरा करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत झाला. बैठकीला शहर आणि जिल्ह्यातील पंचवीसहून अधिक साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रा. डॉ. नलगे यांनी शंभरहून अधिक पुस्तकांचे लेखन केले. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. त्याचबरोबरीने त्यांनी दक्षिण महाराष्ट्रातील अनेक लेखकांना प्रोत्साहन दिले, लिहिते केले. साहजिकच प्रा. डॉ. नलगे यांच्याशी स्नेह असणारा गोतावळा राज्यभरात आहे. ही सारी मंडळी शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त एकवटणार आहेत. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, करवीर नगर वाचन मंदिर, करवीर साहित्य परिषद, व्हिजन प्रकाशन (गडहिंग्लज), स्त्रीसाहित्य मंडळ आदी पंचवीसहून अधिक संस्थांचा सोहळ्यात सक्रिय सहभाग असणार आहे. दरम्यान, आज झालेल्या पूर्वतयारी बैठकीत विविध समित्यांची स्थापना झाली. सोहळ्याची अंतिम कार्यक्रम पत्रिका लवकरच जाहीर केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT