कोल्हापूर

विना परवाना मिरवणूक गुन्हा दाखल

CD

विनापरवानगी मिरवणूक काढल्याने
कार्यकर्त्यांसह डीजे मालकांवर गुन्हा

कोल्हापूर, ता. १३ : गंजीमाळ येथील मध्यस्थ मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि डीजे मालकाविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. याची फिर्याद पोलिस कॉन्स्टेबल तुषार आनंदराव भोसले यांनी दिली. विनापरवाना मिरवणूक काढून शहरातील रस्ते अडवले, कर्णकर्कश ध्वनी यंत्रणेचा वापर करून नागरिकांना त्रास दिल्याबद्दल हा गुन्हा नोंद झाल्याचे जुना राजवाडा पोलसांनी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, प्रणव रवी पाटील, दुर्गेश व्यंकटेश कोळी, उदय जयसिंगराव चौगुले, निशांत व्यंकटेश कोळी (सर्व, रा. गंजी माळ, कोल्हापूर) या कार्यकर्त्यांसह डीजे मालक ऋषिकेश राजू माने (रा. जुना बुधवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्‍यांची नावे आहेत. गंजीमाळ येथील मध्यस्थ मित्रमंडळाने शिवजयंतीच्या निमित्ताने मिरवणूक काढली. त्यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पोलिसांच्या सूचनांचे पालन केले नाही. तसेच कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये स्ट्रक्चर उभे केले. कर्णकर्कश ध्वनी यंत्रणा लावून आणि रस्ते अडवून नागरिकांची गैरसोय केली. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मिसिंग लिंकनंतर पहिल्यांदाच द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची गर्दी

Pune BJP Woman Leader: पुण्यातील महिला भाजप नेत्याचं निधन, वयाच्या ६०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Pune Highway Accident: मुंबई बंगळूर हायवेवर भीषण अपघात, टाटा अल्ट्रोजचा चुराडा; मुंबईच्या दोघांचा मृत्यू, १२ जण जखमी

पद्मिनी कोल्हापूरे-प्रीती सप्रू रस्त्यावरच कचाकचा भांडल्या; संतापलेल्या पोलिसांनी सुनावलं, Viral Video

Mongoose satire story : मुंगूस आणि पाळलेला माणूस

SCROLL FOR NEXT